‘लाल सिंग चड्ढा’ पाहून इंग्लंडचा क्रिकेटर चांगलाच संतापला; म्हणाला, “लज्जास्पद…”

WhatsApp Group

Monty Panesar on Laal Singh Chaddha : आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाबाबत सातत्यानं चर्चा होत आहे. दरम्यान, अनेक क्रिकेटपटूही या चित्रपटाबद्दल भाष्य करत असून, इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू माँटी पानेसारनंही चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. माँटी पानेसारनं हा चित्रपट भारतीय लष्कर आणि शीख समाजाचा अनादर करणारा असल्याचं म्हटलं आहे.

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी बहिष्कार घालण्याची मागणी केली जात होती, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समीक्षणाबाबत चर्चा सुरू झाली आहे. तसंच वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू पानेसरनंही या चित्रपटावर वक्तव्य केलं आहे. पानेसार थोडक्यात संतापला आहे.

काय म्हणाला पानेसार?

माँटी पानेसारनं ट्विटरवर एक ट्वीट केलं आहे. तो म्हणाला, ”फॉरेस्ट गंप हा चित्रपट यूएस आर्मीमध्ये बसतो, कारण अमेरिका व्हिएतनाम युद्धासाठी त्यावेळी कमी आयक्यू असलेल्या व्यक्तीचा शोध घेत होती. पण लाल सिंग चड्ढा हा भारतीय लष्कर आणि शीख समाजाचा पूर्णपणे अपमान करणारा चित्रपट आहे. लज्जास्पद” एवढंच नाही तर पानेसारनं पुढं लिहिलं,”आमिर खान लाल सिंग चड्ढामध्ये मूर्खाची भूमिका साकारत आहे, फॉरेस्ट गंप देखील मूर्ख होता. हे अपमानजनक आहे.” पानेसारनं ट्विट करून लोकांना या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केलं आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट १९९४च्या हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे.

हेही वाचा – या ‘एक’ कारणामुळं आमिर खान बॉलिवूड पार्ट्यांना जात नाही!

फॉरेस्ट गंप रॉबर्ट झेमेकिस यांनी तयार केला होता आणि या चित्रपटानं ६ अकादमी पुरस्कार जिंकले आहेत. यामध्ये प्रसिद्ध अभिनेता टॉम हँक्स मुख्य भूमिकेत होता. आमिरनं इतक्या उत्तम आणि क्लासिक चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक बनवला आहे, अशा परिस्थितीत चाहत्यांना त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत.

आकाश चोप्रा झाला ट्रोल!

एकीकडे पानेसारनं या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे, तर दुसरीकडं टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आकाश चोप्रानं या चित्रपटाचे कौतुक केलं आहे. जेव्हा आकाशनं या चित्रपटाला उत्तम चित्रपट म्हटलं, तेव्हा लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर अनेक युजर्सनी आकाश चोप्राच्या यूट्यूब चॅनलला अनसब्सस्क्रायब करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा – Rakshabandhan : गेल्या २६ वर्षांपासून पंतप्रधान मोदींना पाकिस्तानी बहिणीकडून येते राखी! तुम्हाला माहितीये?

हा चित्रपट पाहिल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटर इरफान पठाणनं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, लाल सिंग चड्ढा यांना पाहण्यात मजा आली. लाल त्याच्या निरागसतेनं तुम्हाला वेड लावेल. आमिर खाननं नेहमीप्रमाणे आपली व्यक्तिरेखा चोख बजावली आहे. अप्रतिम चित्रपट आहे.

Leave a comment