शेवटी विराट कोहलीनं केलं कबूल! म्हणाला, “आपल्याच माणसांनी भरलेल्या खोलीत मला…”

WhatsApp Group

Virat Kohli On Mental Health : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली दीर्घ विश्रांतीनंतर आशिया चषक स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. यासाठी तो आजकाल जिममध्ये प्रचंड घाम गाळत आहे. पण, त्याच्यावर चांगली कामगिरी करण्याचं खूप दडपण आहे. गेल्या अडीच वर्षांपासून फॉर्मात नसलेल्या विराट कोहलीनं आता स्वत: कबूल केलं आहे, की एवढी गर्दी असतानाही त्याला दडपण जाणवत आहे आणि त्याला एकटेपणा जाणवत आहे. त्यांच्या या नुकत्याच आलेल्या विधानामुळं लोक हादरले आहे.

काय म्हणाला विराट?

वास्तविक, वेस्ट इंडिजविरुद्धच्या ब्रेकनंतर विराट कोहली आता आशिया कपमध्ये थेट पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. पण याआधी त्यानं आपल्या मानसिक आरोग्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. ”मला पाठिंबा देणारे लोक एकाच खोलीत असले तरीही मला एकटेपणा वाटतो”, असं विराटनं सांगितलं. याबाबत एका मुलाखतीत बोलताना विराट म्हणाला, “खेळाडूसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा खेळ, त्याला सर्वोत्कृष्ट काय बनवते. पण, तुमच्यावर असलेल्या दबावाचा तुमच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. हा एक गंभीर मुद्दा आहे. आपण जितके अधिक मजबूत राहण्याचा प्रयत्न करू तितकेच ते आपल्याला दूर करेल.”

…ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली

या संदर्भात पुढे बोलताना विराट कोहली म्हणाला, ”जर तुमचा तुमच्या खेळाशी संबंध तुटला तर तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी संपायला जास्त वेळ लागत नाही. तुमचा वेळ कसा घालवायचा ते शिकलं पाहिजे जेणेकरून संतुलन राहील. कोणत्याही व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तरुण खेळाडूंना मी सांगू इच्छितो की तंदुरुस्त राहणं आणि लवकर बरं होणं ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी असलेलं नातं.”

हेही वाचा – ५२ लाखांचा घोडा, गाडी आणि…; ‘या’ ५.७१ कोटींच्या गिफ्ट्समुळं गोत्यात आली जॅकलिन फर्नांडिस! वाचा यादी

”मी असे प्रसंग अनुभवले आहेत, माझ्या खोलीत माझे स्वतःचे लोक मला साथ देत असतानाही मला एकटं वाटायचं. मला माहीत आहे की बरेच लोक यातून गेले आहेत आणि त्यांना ते समजेल. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढा आणि स्वतःशी कनेक्ट व्हा. आपण असं करण्यात अयशस्वी झाल्यास, गोष्टी विस्कळीत होतील”, असं विराटनं म्हटलं. त्यानं सांगितलेला अनुभव २०१४ मध्ये आला होता. त्यानंतर विराट इंग्लंड दौऱ्यावर फलंदाज म्हणून अपयशी ठरला आणि डिप्रेशनमध्येही गेला. मात्र, कालांतराने मेहनत करून तो त्यातून बाहेर पडला.

आशिया चषक २७ ऑगस्टपासून सुरू होत असून टीम इंडियाचा पहिला सामना २८ ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. आज गुरुवारी (१८ ऑगस्ट) विराटनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४ वर्षे पूर्ण केली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment