क्रिकेटविश्वातून मोठी बातमी..! भारताविरुद्धच्या मॅचपूर्वी ‘स्टार’ खेळाडूनं अचानक घेतली रिटायरमेंट

WhatsApp Group

Former Australian Captain Tim Paine Retired : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय मालिका खेळणार आहे. पहिला सामना आज १७ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे, मात्र त्याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टिम पेनने देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो त्याच्या खेळापेक्षा वादांमुळे जास्त चर्चेत राहिला. ऑस्ट्रेलियन संघासाठी तो तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला.

शेफिल्ड शील्ड ट्रॉफीमध्ये क्वीन्सलँड आणि तस्मानिया यांच्यातील सामन्यानंतर टिम पेनने निवृत्ती जाहीर केली. ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम यष्टीरक्षकांमध्ये त्याची गणना होते. स्टीव्ह स्मिथने कर्णधारपद सोडल्यानंतर तो ऑस्ट्रेलियाचा ४६वा कर्णधार ठरला. त्याने २०१० मध्ये लॉर्ड्सवर पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. कसोटी सामन्यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या ९२ धावा होती.

हेही वाचा – Petrol Diesel Price Today : कच्या तेलाची किंमत ७५ डॉलर, जाणून घ्या देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर 

१८ वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम

होबार्टमध्ये जन्मलेल्या टिम पेनने २००५ मध्ये तस्मानियासाठी देशांतर्गत पदार्पण केले. यानंतर तो या संघाकडून १८ वर्षे खेळला, परंतु क्वीन्सलँडविरुद्धचा सामना अनिर्णित राहिल्यानंतर त्याने निवृत्ती जाहीर केली. देशांतर्गत क्रिकेटच्या १५४ सामन्यांमध्ये त्याने ६४९० धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने तीन शतके झळकावली आहेत. त्याचवेळी त्याची सरासरी २९.६३ इतकी आहे. सेक्सटिंगच्या वादात अडकल्याने त्याला ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद गमवावे लागले होते. त्याच्यानंतर पॅट कमिन्सला कर्णधार बनवण्यात आले.

टिम पेनने ऑस्ट्रेलियासाठी ३५ कसोटी, ३५ एकदिवसीय आणि १२ टी-२० यासह ८२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या ८२ सामन्यांमध्ये त्याने २४०० हून अधिक धावा केल्या आहेत, ज्यात कसोटीत १५३४ धावा, एकदिवसीय सामन्यात ८९० धावा आणि टी-२० क्रिकेट कारकिर्दीतील ८२ धावा यांचा समावेश आहे, परंतु पेनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ एक शतक झळकावता आले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment