Lionel Messi : मेस्सी वर्षभरात किती कमाई करतो? अनेक देशांचं बजेटही तेवढं नाही; वाचा आकडा!

WhatsApp Group

Lionel Messi Net Worth : लिओनेल मेस्सीची गणना जगातील दिग्गज फुटबॉलपटूंमध्ये केली जाते. अर्जेंटिनाच्या या सुपरस्टारचे फॅन फॉलोइंग भारतासह अनेक देशांमध्ये आहे. लिओनेल मेस्सीचे चाहतेही मोठ्या संख्येने भारतात आहेत. आता मेस्सीचा संघ अर्जेंटिना फिफा विश्वचषक २०२२च्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहे. अनेक फुटबॉल चाहत्यांना त्याच्या मानधनाबद्दल आणि संपत्तीबद्दल जाणून घ्यायचे आहे.

अनेक देशांमध्ये घर

मेस्सी सध्या जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. त्याने यापूर्वी बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व केले होते, परंतु ऑगस्ट २०२१ मध्ये तो पॅरिस सेंट-जर्मेनमध्ये सामील झाला. या फुटबॉल क्लबसोबत करार म्हणून मेस्सीला मोठी रक्कम मिळाली आणि त्याची नेटवर्थही वाढली. मेस्सीची एकूण संपत्ती बघितली तर ती अब्जावधीत आहे. अनेक देशांमध्ये त्यांची आलिशान घरे आहेत.

हेही वाचा – Horoscope Today : मकर आणि कुंभ राशीच्या लोकांच्या नोकरी-व्यवसाय प्रतिष्ठेत वाढ…! ‘या’ राशीच्या लोकांनी सावध राहा

उत्पन्नाचे अनेक स्त्रोत

मेस्सी केवळ फुटबॉल सामन्यांमधूनच नाही तर अनेक स्रोतांमधून कमाई करतो. यात मोठ्या ब्रँड्ससह टाय-अप, फॅन इंटरअॅक्शन अॅप्स आणि स्वतःचे ड्रेस स्टोअर देखील आहे. इतकंच नाही तर तो कोणत्याही कार्यक्रमाला जातो तेव्हा त्यापेक्षा कितीतरी जास्त कमाई करतो. तो स्वतःचे स्टोअर ‘मेसी स्टोअर’ देखील चालवतो.

अर्जेंटिनात जन्मलेल्या मेस्सीने बार्सिलोनासोबतचा करार संपवला तोपर्यंत मेस्सीची प्रायोजकत्वाची कमाई सुमारे १.३ बिलियन डॉलर्स इतकी होती. ९०० मिलियन डॉलर्स मानधनाव्यतिरिक्त, त्याने आतापर्यंत ४०० मिलियन डॉलर्स एन्डॉर्समेंट करारामधून कमावले आहेत. त्याच्या निव्वळ संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास, एका अहवालानुसार, ती ६२० मिलियन डॉलर्स आहे.

मेस्सीची एकूण संपत्ती किती?

मेस्सीची एकूण संपत्ती अनेक देशांच्या एकूण वार्षिक बजेटइतकी आहे. फोर्ब्सच्या २०२२ सालातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही मेस्सीचे नाव टॉपर्समध्ये होते. त्यानुसार त्याने २०२२ मध्ये १३० मिलियन डॉलर्स कमावले. जर मेस्सीच्या एकूण नेटवर्थबद्दल बोलले तर ते कोमोरोस, गॅम्बिया, सेशेल्स आणि चाडच्या एकूण वार्षिक बजेटपेक्षा जास्त आहे. एवढेच नाही तर सोमालिया, बर्म्युडासारखे देशांचे वार्षिक बजेट मेस्सीच्या एकूण संपत्तीइतके आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment