FIFA World Cup 2022 : फिफा वर्ल्डकपची ट्रॉफी सोन्याची असते का? त्याची किंमत किती?

WhatsApp Group

FIFA World Cup 2022 Trophy History : सध्या फिफा विश्वचषक स्पर्धेने जगभरात चर्चा निर्माण केली आहे. कतारमध्ये २० नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत फुटबॉलचे सर्वात मोठे जेतेपद पटकावण्यासाठी संर्व संघ भिडत आहेत. दर चार वर्षांनी एकदा होणाऱ्या या स्पर्धेत एकूण ३२ संघ सहभागी झाले आहेत. विजेत्या संघाला सोनेरी रंगाची फिफा विश्वचषक ट्रॉफी दिली जाईल. पण, विजेत्या खेळाडूंना मिळणारी ट्रॉफी खरंच सोन्याची असते का? ती विजेत्या संघाला मिळते का? जाणून घ्या…

फिफा विश्वचषक ट्रॉफीचा इतिहास

१९३०-१९७० च्या फुटबॉल विश्वचषक विजेत्या संघाला देण्यात आलेल्या ट्रॉफीला ‘ज्युल्स रिमेट ट्रॉफी’ असे म्हणतात. सध्या दर चार वर्षांनी होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेतील विजेत्या संघाला देण्यात येणाऱ्या ट्रॉफीचा सराव १९७४ पासून केला जात होता. या ट्रॉफीच्या डिझाइनबाबत अनेक प्रस्ताव आले होते. ५३ मॉडेल्सपैकी, इटालियन कलाकार सिल्व्हियो गझानिगा यांचे डिझाइन आवडले. त्यांच्याकडे ट्रॉफी बनवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

हेही वाचा – दिल्ली हादरली..! तरुणाकडून आई-वडील, आजी आणि बहिणीची हत्या

ट्रॉफीची किंमत?

फिफा विश्वचषक ट्रॉफीची उंची ३६.५ सेमी आहे. ट्रॉफी बनवण्यासाठी ६.१७५ किलो १८ कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला. ट्रॉफीचा १३ सेमी व्यासाचा गोलाकार पाया आहे, त्याच पायावर ‘फिफा वर्ल्ड कप’ कोरलेला आहे. ट्रॉफी आतून पोकळ आहे. फिफा विश्वचषक ट्रॉफी ही आंतरराष्ट्रीय खेळांमधील सर्वात महागडी ट्रॉफी मानली जाते. यूएसए टुडेने २०१८ मध्ये ट्रॉफीची किंमत २० मिलियन असेल असा अंदाज वर्तवला होता.

१९३०-१९७० मध्ये फुटबॉल विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला ज्युल्स रिमेट ट्रॉफी देण्यात आली, परंतु नवीन ट्रॉफीसाठी नियम वेगळे आहेत. कोणताही संघ खरा ट्रॉफी जिंकू शकत नाही. मूळ ट्रॉफीऐवजी, विजेत्या संघाला फिफा विश्वचषक ट्रॉफीची प्रतिकृती दिली जाते, म्हणजे सोन्याचा मुलामा असलेली कांस्य ट्रॉफी सारखी दिसते.

हेही वाचा – Gold Silver Price : खुशखबर! सोन्याचांदीच्या किमतीत घसरण…. जाणून घ्या आजचे नवे दर 

मूळ ट्रॉफीबाबत नियम

फिफाचे मुख्यालय स्वित्झर्लंडची राजधानी झुरिच येथे आहे. काही प्रसंग वगळता फिफा विश्वचषक ट्रॉफी झुरिच येथील मुख्यालयात कडेकोट सुरक्षेत ठेवण्यात आली आहे. खरी ट्रॉफी फक्त काही औपचारिक प्रसंगी दिसते, जसे की ट्रॉफी टूर, वर्ल्ड कपचा अंतिम सामना इ. मूळ ट्रॉफीला केवळ काही निवडक लोकच स्पर्श करू शकतात, ज्यात राज्यप्रमुख आणि माजी विश्वचषक विजेते यांचा समावेश आहे.

Leave a comment