FIFA World Cup 2022 : कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषक २०२२ मध्ये अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. रविवारी फिफा क्रमवारीत नंबर-२ असलेल्या बेल्जियमला मोरोक्कोकडून (Belgium vs Morocco) ०-२ असा पराभव स्वीकारावा लागला. या धक्कादायक पराभवामुळे सर्व संतप्त झाले. या पराभवानंतर बेल्जियममध्ये चाहते अनियंत्रित झाले आणि विविध शहरांमध्ये दंगलीसारखी परिस्थिती निर्माण झाली.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विश्वचषक सामन्यातील पराभवानंतर हजारो चाहते बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये रस्त्यावर उतरले आणि संघाविरोधात घोषणाबाजी केली. याठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांनी वाहने व दुचाकींवर येऊन निषेध केला. मात्र लवकरच या आंदोलनाचे हिंसाचारात रूपांतर झाले. येथे अनेक ठिकाणी मोरोक्को आणि बेल्जियमचे चाहते आमनेसामने आले आणि दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. हाणामारी, उत्सव आणि संतापाच्या या वातावरणात सार्वजनिक वाहनांची तोडफोड करण्यात आली.
Riots in Belgium after Morocco defeat them at the World Cup !! https://t.co/AsUYtMjTuc
— Sanjeev Sanyal (@sanjeevsanyal) November 27, 2022
हेही वाचा – ऐकलं का..! सरकार आणतंय नवा नियम; आता प्रत्येकाचा फोन नंबर होणार…
दरम्यान, स्थानिक प्रशासनाकडून मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहनांच्या सेवेवर काही काळ बंदी घालण्यात आली होती. आंदोलकांना या ठिकाणी प्रवेश मिळू नये म्हणून मेट्रो स्टेशनचे दरवाजे बंद करण्यात आले होते. तरीही ब्रुसेल्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही निर्बंध लागू करण्यात आले असून परिस्थिती सामान्य होण्याची वाट पाहत आहे.
Colonized Brussels: Moroccan Migrants Celebrate Their Team's World Cup Victory Over Belgium with Riots
One-third of the country’s population is of foreign origin; in Brussels, Belgians are the minority.
See Videos: https://t.co/wNPpY2P7ge pic.twitter.com/7x7n22UnsW
— Amy Mek (@AmyMek) November 27, 2022
हिंसाचाराची आग नेदरलँडपर्यंत पोहोचली..
ब्रुसेल्स पोलिसांचे प्रवक्ते इल्से व्हॅन डी कीरे यांनी सांगितले की, अनेक दंगलखोर रस्त्यावर उतरले, त्यांनी कार, ई-स्कूटर पेटवून दिली आणि वाहनांवर दगडफेक केली. या घटनेत एक जण जखमी झाल्याने पोलिसांनी कारवाई केली. नेदरलँड्समध्ये तसेच ब्रुसेल्समध्ये हिंसाचार सुरू झाला, जिथे स्थानिक पोलिसांनी सांगितले की रॉटरडॅममध्ये हिंसाचार सुरू झाला कारण दंगल अधिकाऱ्यांनी सुमारे ५०० लोकांच्या फुटबॉल समर्थक गटाला रोखण्याचा प्रयत्न केला ज्यांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि जाळपोळ आणि तोडफोड केली.
Belgium 🇧🇪 👀💥
Towns And Cities Are Now Being Destroyed And Smashed Up Across Brussels As Riots By Non Natives Escalate Into The Night. pic.twitter.com/q3gA8SiWKu— Suzanne Seddon (@suzseddon) November 27, 2022
नेदरलँडमधील या घटनेत दोन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत, रविवारी संध्याकाळी उशिरा अनेक शहरांमध्ये अशांतता पसरली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशाची राजधानी अॅमस्टरडॅम आणि हेगमध्ये अशांततेचे वातावरण आहे.