FIFA World Cup 2022 : मेस्सीचा चमत्कार..! गोलकीपरला ‘असं’ चकवून मारला गोल; पाहा Video

WhatsApp Group

Lionel Messi Goal : फिफा वर्ल्डकप २०२२ मध्ये (FIFA World Cup 2022) मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यात अर्जेंटिनाने २-० असा दणदणीत विजय मिळवला. या विजयात महान खेळाडू मेस्सीनेही गोल केल्याने संघाला मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यात बरोबरी मिळाली. वास्तविक, पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांकडून एकही गोल झाला नाही, मात्र दुसऱ्या हाफमध्ये मेस्सीने गोल करत संघाला धार मिळवून दिली. मेस्सीचा विश्वचषकातील हा ८वा गोल होता. दुसऱ्या हाफच्या ६४व्या मिनिटाला मेस्सीने कमाल केली आणि मेक्सिकोच्या गोलरक्षकाला चकमा देत गोल केला. मेस्सीच्या या शानदार गोलने चाहत्यांची मने जिंकली. मेस्सीच्या या गोलचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.

मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यात जिथे मेस्सीने गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली, तिथेच त्याने आपला सहकारी एन्झो फर्नांडीझला सामन्याच्या ८७व्या मिनिटाला गोल करण्यास मदत केली. मेस्सी आणि एन्झो फर्नांडिस यांच्या समंजसपणामुळे अर्जेंटिनाने ८७व्या मिनिटाला गोल करत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली, जो सामन्यातील निर्णायक गोल ठरला. अखेरीस, अर्जेंटिनाने मेक्सिकोचा २-० असा पराभव करत फिफा विश्वचषक स्पर्धेतील पहिला विजय मिळवला.
सौदी अरेबियाकडून झालेल्या पराभवानंतर अर्जेंटिनासाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता. आता मेक्सिकोविरुद्धच्या विजयाने अर्जेंटिनाचे विश्वचषक कायम राखले आहे.

हेही वाचा – Flipkart Sale मध्ये बंपर ऑफर..! स्वस्त झाले महागडे फोन; आयफोनवरही ‘मोठा’ डिस्काऊंट

मेस्सीचा रेकॉर्ड

मेस्सीने आपल्याच देशाचा महान खेळाडू असलेल्या मॅराडोनाच्या विक्रमाची बरोबरी केली. वास्तविक, फिफा विश्वचषकाच्या इतिहासात मॅराडोनाने अर्जेंटिनासाठी आपल्या कारकिर्दीत ८ गोल केले होते. त्याचबरोबर आता मेस्सीनेही वर्ल्ड कपमध्ये ८ गोल करत मॅराडोनाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. त्याच वेळी, गॅब्रिएल बतिस्तुताने सर्वाधिक १० वर्ल्डकप गोल करण्याचा अर्जेंटिनाचा विक्रम केला आहे.

Leave a comment