FIFA World Cup 2022 : आईला पाहून लहान मुलासारखा रडला मेस्सी..! Video होतोय तुफान व्हायरल; पाहा!

WhatsApp Group

Lionel Messi Emotional Celebration With His Mother : अर्जेंटिना संघाने फिफा विश्वचषक २०२२ची (FIFA World Cup 2022) ट्रॉफी घरी नेली आहे. रोमहर्षक लढतीत लिओनेल मेस्सीच्या संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले. विश्वविजयानंतर संपूर्ण संघ, खेळाडूंचे कुटुंब आणि चाहते जल्लोषात होते. विजयानंतर मेस्सीची आई त्याला मिठी मारण्यासाठी आली आणि दोघेही एकमेकांना पाहून रडले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अंतिम सामना पाहण्यासाठी मेस्सीचे संपूर्ण कुटुंब कतारमध्ये होते. मॅच संपल्यानंतर मेस्सीची आई, पत्नी आणि मुले त्याला भेटायला आले आणि सगळे खूप खुश झाले. मेस्सीची आईही आपल्या मुलाला आणि संघाला पाठिंबा देण्यासाठी आली होती. तिने संघाची जर्सीही घातली होती. विजयानंतर ती धावतच मैदानात आली आणि तिने मेस्सीला मागून पकडले. आईला पाहून मेस्सी आपले अश्रू रोखू शकला नाही आणि आनंदाने रडला.

हेही वाचा – FIFA World Cup Final : सार्थकी लागलं मेस्सीचं आयुष्य…! ३६ वर्षानंतर अर्जेंटिनानं जिंकला फिफा वर्ल्डकप

मेस्सी त्याच्या आईच्या खूप जवळ आहे आणि त्याने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की त्याच्या आईने त्याला मोठे करण्यासाठी आणि त्याला फुटबॉल शिकवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मुलगा वर्ल्ड चॅम्पियन होताना पाहून मेस्सीच्या आईलाही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही.

ट्रॉफी उचलल्यानंतर मेस्सीने पत्नी आणि मुलांचीही भेट घेतली. मेस्सीची पत्नी अँटोनेला रोकुझो ही त्याची बालपणीची मैत्रिण आहे आणि दोघांनी २०१७ मध्ये लग्न केले. त्यांना थियागो, माटेओ आणि सिरो ही तीन मुले आहेत. तिन्ही मुलेही फायनलमध्ये वडिलांना सपोर्ट करण्यासाठी पोहोचली होती आणि ट्रॉफी उचलून खूप सेलिब्रेशन केले. अर्जेंटिनाच्या कर्णधाराचा हा शेवटचा विश्वचषक होता आणि त्याला संस्मरणीय निरोप मिळाला. विश्वचषक जिंकण्यासोबतच त्याने गोल्डन बॉलचा पुरस्कारही पटकावला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment