FIFA World Cup 2022 : फिफा विश्वचषक २०२२ लिओनेल मेस्सीचा संघ अर्जेंटिनाची चमकदार कामगिरी सुरूच आहे. शुक्रवारी (९ डिसेंबर) उशिरा खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँड्सचा ४-३ असा पराभव केला. या विजयासह अर्जेंटिनाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता उपांत्य फेरीत अर्जेंटिनाचा सामना क्रोएशियाशी होणार आहे. कोशियाने ब्राझीलला हरवून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे.
परेडेसने सुरू केले भांडण
नेदरलँड-अर्जेंटिना सामन्यादरम्यान बराच गदारोळ झाला आणि दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भिडले. ही संपूर्ण घटना खेळाच्या ८८व्या मिनिटाला घडली, जेव्हा अर्जेंटिनाचा संघ २-१ने आघाडीवर होता. अर्जेंटिनाचा मिडफिल्डर लिएंड्रो परेडेसने नॅथन अकेला टॅकल केले, ज्यामुळे मॅच रेफ्रीने फाऊलसाठी शिट्टी वाजवली. याचा राग परेडेसला आला आणि त्याने नेदरलँड्सच्या डगआऊटमध्ये चेंडू मारला.
Benches clear at Netherlands vs. Argentina 😳😳 pic.twitter.com/X53Ny5GlGo
— Cyrus Eshaghoff (@CyrusEshaghoff) December 9, 2022
The Netherlands vs Argentina game was one for the books.
4 goals, a shoot out, penalty saves, 15 yellow cards and this crazy moment 🔥🍿
Imagine going back to club football after this 😏pic.twitter.com/kjKWuC9AEN
— CrossAndNod (@crossandnodFT) December 9, 2022
नेदरलँड्सचे खेळाडूही परेडेसचा सामना करण्यासाठी मैदानावर पोहोचले. बचावपटू व्हर्जिल व्हॅन डायक धावत आला आणि परेडेसला धक्का दिला. त्याचवेळी डचच्या उर्वरित खेळाडूंनीही संताप व्यक्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मॅच रेफरीने दोन्ही संघातील खेळाडूंना कसे तरी वेगळे केले. रेफ्रींनी परेडेस आणि बर्घुईस यांनाही पिवळे कार्ड दाखवले, त्यानंतर खेळ सुरू राहिला.
हेही वाचा – Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या दरात घसरण, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल?
असा रंगला सामना…
सामन्यातील पहिला गोल अर्जेंटिनाच्या नहुएल मोलिनाने केला, ज्यामध्ये लिओनेल मेस्सीचा असिस्ट होता. या एका गोलमुळे अर्जेंटिनाने पूर्वार्धात १-० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धातही खेळ खूपच रोमांचक झाला. डेन्झेल डम्फ्रीसने बॉक्सच्या आत फाऊल केला आणि अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली. लिओनेल मेस्सीने पेनल्टीमध्ये आपल्या संघाला २-०ने पुढे केले.
यानंतर नेदरलँड्सने खेळाच्या ८३व्या मिनिटाला गोल करून २-१अशी आघाडी घेतली. त्यानंतर इंज्युरी टाईमच्या जवळपास शेवटच्या मिनिटात नेदरलँड्सने दुसरा गोल करत सामना २-२ असा बरोबरीत आणला. निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत सुटल्यानंतर मॅट अतिरिक्त वेळेत गेला जिथे एकही गोल झाला नाही. यानंतर पेनल्टी शूटआऊटचा आधार घ्यावा लागला.
Argentina vs Netherlands
Penalty shoot out#FIFAWorldCup2022 #FIFA #Argentina #NetherlandsvsArgentina pic.twitter.com/2lNhX2tvyH— Patokini (@nito_tito) December 9, 2022