FIFA WC 2022 : ओपनिंग सेरेमनी कधी? पहिला सामना कुणात? कुठं पाहता येणार हे सर्व? वाचा इथं!

WhatsApp Group

FIFA WC 2022 Live Streaming : फुटबॉलची भव्य फिफा विश्वचषक स्पर्धा २०२२ आजपासून सुरू होत आहे. आज संध्याकाळी सामन्यापूर्वी भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचवेळी, पहिला सामना यजमान कतार आणि अ गटातील इक्वेडोर यांच्यात होणार आहे. हा सोहळा कुठे टेलिकास्ट होईल आणि तुम्हाला सामना कधी पाहता येईल? ही सर्व माहिती मिळवण्यासाठी ही बातमी पुढे वाचा.

उद्घाटन समारंभ आधी २१ नोव्हेंबर रोजी होणार होता, परंतु कतारच्या आदेशानुसार फिफाने २० नोव्हेंबर रोजी तारीख निश्चित केली. त्यानंतर हा भव्य कार्यक्रम जिथे होणार आहे तिथे उद्घाटनाचा सामनाही खेळवला जाणार आहे. ओपनिंग सेरेमनीमध्ये अनेक स्टार्स पाहायला मिळतील. प्रसिद्ध बीटीएस बँडपासून ते नोरा फतेहीचे नृत्य सादरीकरणही आज कतारमध्ये पाहता येईल.

हेही वाचा – मराठी भाषेतून शिक्षण देण्यावर राज्य शासन भर देणार, दीपक केसरकरांची माहिती

पहिला सामना कुणात?

कतारमधील अल बायत स्टेडियमवर फुटबॉल वर्ल्डकपचा उद्घाटन सोहळा होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजतापासून ते सुरू होणार आहे. तुम्ही स्पोर्ट्स १८ आणि स्पोर्ट्स १८ एचडी वर उद्घाटन समारंभाचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. याशिवाय, तुम्ही Jio TV वर लाइव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता. पहिला म्हणजेच विश्वचषकाचा उद्घाटन सामना कतार आणि इक्वेडोर यांच्यात फक्त अल बायत स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ९.३० वाजता सुरू होईल.

Jio Cinema अॅपवर तुम्ही फुटबॉल विश्वचषक सामने विनामूल्य पाहू शकता. Jio, Vi, Airtel आणि BSNL चे ग्राहकही याद्वारे फुटबॉल वर्ल्ड कपचा आनंद घेऊ शकतात. जिओ सिनेमा सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण करणार आहे. येथे हिंदी आणि इंग्रजीसह एकूण पाच भाषांमध्ये सामन्याचा आनंद लुटता येईल.

Leave a comment