Hardik Pandya : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यासाठी गेले 9 महिने चढ-उतारांनी भरलेले आहेत. एकदिवसीय विश्वचषक 2023 दरम्यान दुखापत झालेला हार्दिक पांड्या बराच काळ भारतीय संघाबाहेर होता, त्यादरम्यान आयपीएल फ्रेंचायझी मुंबई इंडियन्सने त्याला आयपीएल 2024 पूर्वी संघाचा नवा कर्णधार बनवले होते, ज्यामुळे भारतीय चाहते खूप नाराज झाले होते. आयपीएलच्या 17व्या हंगामात त्याला प्रत्येक सामन्यादरम्यान रोषाला सामोरे जावे लागले, ज्यामुळे त्याच्या कामगिरीवरही परिणाम झाला. मात्र, एका महिन्यानंतर भारतीय जर्सी परिधान करून हार्दिक पांड्याने भारताला दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर आता चाहते घोषणाबाजी करताना दिसत आहेत.
टी-20 विश्वचषक जिंकणारा भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी विशेष विमानाने मायदेशी परतला. सतत रिमझिम पाऊस आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये खेळाडूंचे विमानतळावर चाहत्यांनी जोरदार स्वागत केले, त्यानंतर संघातील सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर भारतीय संघ मुंबई विमानतळावर पोहोचला असून तेथे खुल्या बसमध्ये विजयी परेड होईल आणि त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर सत्कार समारंभ होईल.
It's called Redemption.
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) July 4, 2024
From boos to sloganeering of Hardik-Hardik in just 2 months ❤️🔥 pic.twitter.com/A8sviEfRTo
हेही वाचा – Budget 2024 : 10 वर्षानंतर होणार बदल, नोकरदार व्यक्तीला मिळणार खुशखबर?
See you soon, Wankhede ☺️ pic.twitter.com/lHOKvYdEqh
— hardik pandya (@hardikpandya7) July 4, 2024
मुंबईत परेड सुरू होण्यापूर्वी स्टेडियम हार्दिक-हार्दिकच्या आवाजाने दुमदुमले. काही महिन्यांपूर्वीच हार्दिकला याच ठिकाणी रोषाचा सामना करावा लागला होता. भारताने यापूर्वी 1983 (ODI), 2007 (T20) आणि 2011 (ODI) विश्वचषक जिंकले होते. सतरा वर्षांपूर्वी मुंबईत असाच एक रोड शो आयोजित करण्यात आला होता जेव्हा 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धोनीच्या संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला होता.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा