धोनीचा जबरा फॅन, स्वत: च्या लग्नपत्रिकेत लावला ‘असा’ फोटो!

WhatsApp Group

MS Dhoni On Wedding Card : महेंद्रसिंह धोनीचे चाहते जगभरात आहेत. धोनीचे चाहते सर्वत्र आपापल्या परीने त्यांचे प्रेम दाखवतात. काही चाहते असे असतात की ते सर्व मर्यादा ओलांडतात. भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनीच्या अशाच एका चाहत्याची सध्या खूप चर्चा होत आहे. धोनीच्या या चाहत्याने स्वतःच्या लग्नाच्या कार्डवर धोनीचा फोटो लावला.

सोशल मीडियावर एक लग्नपत्रिका व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका व्यक्तीने धोनीचा फोटो त्याच्या जर्सी क्रमांकासह आणि त्याचे नाव छापले आहे. धोनीच्या जर्सीवर 7 नंबर लिहिलेला आहे तसेच संपूर्ण कार्ड पिवळ्या रंगाने रंगवण्यात आले आहे.

हेही वाचा – Shaktimaan : ‘शक्तिमान’वर येतोय चित्रपट, बजेट असणार 200 ते 300 कोटी!

ही व्यक्ती छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यातील रहिवासी आहे. कार्डवर त्याचे नाव दीपक लिहिले आहे आणि त्याच्या भावी पत्नीचे नाव गरिमा आहे. दीपकचा विवाह 7 जून रोजी आहे. असे सांगितले जात आहे की, दीपकने महेंद्रसिंह धोनीलाही एक कार्ड देऊन लग्नासाठी आमंत्रित केले आहे.

मात्र, चाहत्यांनी लग्नपत्रिकेवर कुणाचा फोटो छापण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी पंतप्रधान मोदी आणि इतर नेते, अभिनेते आणि खेळाडूंचे फॅन्सचे फोटो लग्नपत्रिकेवर छापण्यात आले आहेत. आता रायगडच्या दीपक पटेलने आपल्या लग्नाच्या कार्डावर महेंद्रसिंह धोनीचा फोटो छापला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment