MS Dhoni | इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या सुरुवातीची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी मैदानावर पुन्हा परतणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी आता फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. गेल्या वेळी त्याने आपल्या संघासाठी पाचवी ट्रॉफी जिंकली होती. गेल्या मोसमात धोनी पुढच्या मोसमात दिसणार नाही आणि तो निवृत्त होणार असल्याची अटकळ बांधली जात होती. मात्र, विजयानंतर धोनीने या अफवा फेटाळून लावत आपण पुढच्या सीझनसाठीही तयार आहोत, असे सांगितले. आता धोनीची एक सोशल मीडिया पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
धोनीने फेसबुकवर लिहिले की, नव्या सीझनमध्ये तो एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. आयपीएल 2023 नंतर धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. अलीकडेच, आयपीएल 2024 साठी तो सराव करत असतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
हेही वाचा – रतन टाटांची ड्रीम कंपनी ‘टाटा मोटर्स’चे होणार दोन तुकडे!
धोनीच्या नव्या पोस्टनंतर तो सीएसकेचा कोच किंवा मेंटॉर बनू शकतो का, अशी अटकळ सुरू झाली आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या प्री-सीझन कॅम्पला शनिवारी सुरुवात झाली. वेगवान गोलंदाज दीपक चहरने जबरदस्त गोलंदाजी केली. 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल हंगामाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन (TNCA) च्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले, की काही खेळाडू शुक्रवारी आले आणि येत्या काही दिवसांत आणखी खेळाडू येण्याची अपेक्षा आहे. सिमरजीत सिंग (वेगवान गोलंदाज), राजवर्धन हंगरगेकर (अष्टपैलू खेळाडू), मुकेश चौधरी (वेगवान गोलंदाज), प्रशांत सोळंकी (स्पिनर), अजय मंडल (अष्टपैलू खेळाडू) आणि दीपक चहर (वेगवान गोलंदाज) शिबिरात सामील झाले.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!