ब्रेकिंग न्यूज! स्टुअर्ट ब्रॉडकडून निवृत्तीची घोषणा, 17 वर्षांच्या करियरचा अंत!

WhatsApp Group

Stuart Broad : इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. अॅशेस मालिकेतील पाचव्या सामन्यात तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर ब्रॉडने जाहीर केले की, हा त्याचा शेवटचा सामना असेल. तो यापुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच देशांतर्गत सामन्यांमध्येही खेळणार नाही. 37 वर्षीय ब्रॉडने 2006 मध्ये इंग्लंडकडून पदार्पण केले होते. त्यांची कारकीर्द जवळपास 17 वर्षांची होती.

ब्रॉडने 2007 मध्ये श्रीलंका क्रिकेट संघाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 167 कसोटीत 27.64 च्या सरासरीने आणि 2.98 च्या इकॉनॉमी रेटने 602 बळी घेतले आहेत. त्याने 20 डावात 5 आणि 3 सामन्यात 10 बळी घेतले आहेत. फलंदाजीच्या जोरावर त्याने 243 डावात 3,656 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 1 शतक आणि 13 अर्धशतके आहेत.

हेही वाचा – WI Vs IND 2nd ODI : भारत 181 धावांवर ऑलआऊट, इशान किशनचे अर्धशतक

अॅशेस 2023 मध्ये ब्रॉडने शानदार गोलंदाजी करत आतापर्यंत 20 बळी घेतले आहेत. सध्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ 2023 च्या ऍशेस मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment