इंग्लंडच्या ‘स्टार’ क्रिकेटरनं दुसऱ्यांदा घेतली रिटायरमेंट; म्हणाला, “हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखं…”

WhatsApp Group

Moeen Ali Test cricket Retirement : अष्टपैलू खेळाडू मोईन अलीच्या रूपाने इंग्लंडला कसोटी क्रिकेटमध्ये मोठा धक्का बसला आहे. मोईन अलीने कसोटीमधून दुसऱ्यांदा निवृत्तीची घोषणा केली. त्याने सप्टेंबर २०२१ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पण ३५ वर्षीय मोईनने यावर्षी जून महिन्यात पुन्हा एकदा कसोटीत पुनरागमन करू शकेन, असे म्हटले होते. मात्र आता त्याने या फॉरमॅटला कायमचा रामराम करणार असल्याचे सांगितले.

इंग्लंड संघ २०२२ च्या अखेरीस पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मोईन अलीने पाकिस्तान दौऱ्यात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले. याबाबत प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्क्युलम यांच्याशी बोलल्याचेही त्याने सांगितले. त्याने २०१४ मध्ये कसोटीत पदार्पण केले. त्याने ६४ कसोटी सामन्यांमध्ये २९१४ धावा केल्या आहेत आणि १९५ बळीही घेतले आहेत.

हेही वाचा – रेशनकार्डधारकांसाठी ‘गोड’ न्यूज..! दिवाळीला एका पाकिटात मिळणार ‘या’ गोष्टी; किंमत फक्त १०० रुपये!

कसोटी क्रिकेट हे अवघड काम – मोईन अली

आपल्या कसोटी कारकिर्दीबद्दल मोईन अली म्हणाला, ”कसोटी क्रिकेट हे अवघड काम आहे. मी ३५ वर्षांचा झालो आहे. आता मला माझ्या क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. माझ्या निर्णयावर मागे जाणे आणि नंतर माझे सर्वोत्तम देण्यासाठी कठोर परिश्रम करणे माझ्यासाठी योग्य होणार नाही. इंग्लंडकडून ६४ कसोटी सामने खेळणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment