World Cup 2023 ENG vs NZ : आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या 13व्या हंगामाला धमाकेदार सुरुवात झाली आहे. गतवेळच्या उपविजेत्या न्यूझीलंड क्रिकेट संघाने गतविजेत्या चॅम्पियन इंग्लंडचा सहज (ENG vs NZ) पराभव करून विजयी सुरुवात केली आहे. युवा फलंदाज रचिन रवींद्र आणि सलामीवीर डेव्हॉन कॉनवे यांच्या स्फोटक शतकी खेळीच्या जोरावर किवी संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 9 गडी राखून पराभव केला. यासह न्यूझीलंडने चार वर्षांपूर्वी वर्ल्डकपमध्ये इंग्लंडकडून झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला.
इंग्लंडने दिलेल्या 283 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने 36.2 षटकात 9 गडी राखून विजय मिळवला. रचिन रवींद्रने 96 चेंडूंत 11 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 123 धावा केल्या. डेव्हॉन कॉनवेने 121 चेंडूत 19 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 152 धावांची खेळी केली. रचिनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
इंग्लंडकडून 282 धावा (World Cup 2023 ENG vs NZ)
इंग्लंड संघाने सुरुवातीच्या विकेट लवकर गमावल्या, अशा स्थितीत मोर्चा सांभाळण्याची जबाबदारी जो रूटच्या खांद्यावर आली. जो रूटने आपली जबाबदारी चोख पार पाडली. त्याने 86 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 77 धावांची खेळी केली. कप्तान जोस बटलरने 43 धावांचे योगदान दिले. इंग्लंडने 50 षटकात 9 बाद 282 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने 3 विकेट्स काढल्या. ग्लेन फिलिप्स आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – Video : बाबो…जो रूटचा जबरदस्त षटकार, वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये दाखवला जलवा!
दोन्ही संघांची Playing 11 (World Cup 2023 ENG vs NZ)
इंग्लंड – जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (विकेटकीपर/कप्तान), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड.
न्यूझीलंड – डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर/कप्तान), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!