रचिन रवींद्र – वर्ल्डकपच्या पहिल्याच रात्री इंग्लंडला पडलेलं वाईट स्वप्न!

WhatsApp Group

Rachin Ravindra Century In World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 च्या पहिल्याच सामन्यात (World Cup 2023 ENG vs NZ)न्यूझीलंडचा फलंदाज रचिन रवींद्रने इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले. त्याने इंग्लंडच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांविरुद्ध शानदार फलंदाजी करत न्यूझीलंडसाठी इतिहास रचला. रचिन रवींद्र एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात न्यूझीलंड संघासाठी शतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये त्याने ही कामगिरी केली.

रचिन रवींद्रने 82 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले. 2023 च्या विश्वचषकाची अशी सुरुवात होईल याची कोणालाच कल्पना नव्हती. रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे यांनी न्यूझीलंडसाठी एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी केली. प्रथमच संघाकडून कोणत्याही विकेटसाठी 200 किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी झाली. यापूर्वी 1996 मध्ये ख्रिस हॅरिस आणि ली जर्मन यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 168 धावांची भागीदारी केली होती. त्याचवेळी ब्रेंडन मॅक्क्युलम आणि मार्टिन गप्टिल यांनी 2011 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 160 धावांची भागीदारी केली होती.

हेही वाचा – World Cup 2023 ENG Vs NZ : याला म्हणतात बदला! न्यूझीलंडने इंग्लंडची उडवली झोप

इंग्लंडने दिलेल्या 283 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने 36.2 षटकात 9 गडी राखून विजय मिळवला. रचिन रवींद्रने 96 चेंडूंत 11 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 123 धावा केल्या. डेव्हॉन कॉनवेने 121 चेंडूत 19 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 152 धावांची खेळी केली.

विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावणारे सर्वात तरुण खेळाडू

  • विराट कोहली – 22 वर्षे 106 दिवस
  • अँडी फ्लॉवर्स – 23 वर्षे 301 दिवस
  • रचिन रवींद्र – 23 वर्षे 321 दिवस*

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment