भारताच्या माजी कॅप्टनकडून पैशाची अफरातफर! तब्बल 20 कोटींचा गंडा, ईडीची अॅक्शन!

WhatsApp Group

Mohammad Azharuddin : मोहम्मद अझरुद्दीन अडचणीत सापडला आहे. अझरुद्दीनला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स बजावले आहे. अझरुद्दीनवर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात 20 कोटींचा गंडा घातल्याचं सांगण्यात येत आहे. भारताचा माजी कर्णधार अझरुद्दीन गुरुवारी हैदराबादमध्ये ईडीसमोर हजर होणार आहे.

केंद्रीय तपास एजन्सी ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये (एचसीए) आर्थिक अनियमिततेचे प्रकरण समोर आले आहे. यानंतर ईडीने एचसीए अधिकाऱ्यांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. ईडीने तेलंगणातील 9 ठिकाणी छापे टाकून अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत.

हेही वाचा – डायबिटीजवर कायमचा उपचार! फक्त अर्ध्या तासाचे ऑपरेशन, चिनी शास्त्रज्ञांचा दावा

हे संपूर्ण प्रकरण हैदराबादमधील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमच्या बांधकामातील आर्थिक अनियमिततेचे आहे. अधिकाऱ्यांनी खासगी कंपन्यांना चढ्या दराने कंत्राटे देऊन असोसिएशनचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडीने तीन एफआयआर नोंदवले असून पुढील तपास सुरू आहे. स्टेडियमसाठी डीजी सेट, फायर फायटिंग स्टार्टर्स आणि कॅनॉपीज खरेदीसाठी राखून ठेवलेल्या 20 कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर केल्याचा तपास आहे. असोसिएशनचे सीईओ सुनील कांत बोस यांनी अझहरविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केली आहे. मात्र, अझरुद्दीनने आपल्यावरील आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.

61 वर्षीय मोहम्मद अझरुद्दीनने 99 कसोटी आणि 334 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने 47 कसोटी आणि 174 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अझरुद्दीनने राजकारणात प्रवेश केला. 2009 मध्ये तो लोकसभेचे सदस्य राहिला. अझरुद्दीन तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्षही राहिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment