Shahid Afridi On Indian Bowlers : टीम इंडिया सध्या वनडेमध्ये जगातील नंबर 1 टीम आहे. अलीकडेच, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने आशिया कप 2023 मध्ये चमकदार कामगिरी केली आणि विजेतेपदही पटकावले. वर्ल्डकपमधील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने आपल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने मोठा विजय नोंदवला. दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने सांगितले, की मांसाहारामुळे टीम इंडियाच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. त्याने संघाच्या गोलंदाजीतील सुधारणेचा संबंध मांसाहाराशी जोडला आहे. नुकतेच आशिया कपच्या फायनलमध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने श्रीलंकेविरुद्ध 6 विकेट घेतल्या.
जिओ न्यूजच्या बातमीनुसार, एका स्थानिक स्पोर्ट्स शोमध्ये शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi News In Marathi) म्हणाला, भारतीय गोलंदाजांनी आता मटण खायला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे. गेल्या काही वर्षांवर नजर टाकली तर भारतात महान वेगवान गोलंदाज जन्माला आले नाहीत, पण आता हा ट्रेंड बदलत आहे. भारताकडे आता जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजसारखे सर्वोत्तम गोलंदाज आहेत.
भारताकडे आता 2 संघ
शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi Meat News In Marathi) सांगितले की, याआधी सौरव गांगुलीने कर्णधार असताना खूप बदल केले. मग धोनीने ज्या प्रकारे सर्व वरिष्ठांना सोबत ठेवले ते कौतुकास्पद आहे. बीसीसीआयनेही अनेक योग्य पावले उचलली. यामध्ये आयपीएलसारख्या स्पर्धांचे आयोजनही समाविष्ट आहे. येथे देशांतर्गत क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळते. बीसीसीआयने संपूर्ण देशांतर्गत क्रिकेटची जबाबदारी राहुल द्रविडसारख्या दिग्गज खेळाडूकडे दिली आहे. क्रिकेटपटूंना कसे तयार करायचे हे त्यांना माहीत आहे. त्याने खूप मेहनत घेतली, त्यामुळेच आता भारत 2 संघ तयार करत आहे.
हेही वाचा – VIDEO : ड्रेसिंग रूममध्ये विराट कोहलीला मिळालं बक्षीस, सर्वांकडून टाळ्यांचा कडकडाट!
2011 च्या एकदिवसीय विश्वचषकात शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi On Team India) पाकिस्तान संघाचा कर्णधार होता. या संघाला उपांत्य फेरीत भारताकडून पराभव पत्करावा लागला होता. यानंतर, धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 28 वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषक जिंकला. वर्ल्डकप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होणार आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तान संघाला कधीही भारतीय संघाला पराभूत करता आलेले नाही.
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!