धोनी म्हणतो, “दीपक चहर हा ड्रग्जसारखा, माझ्या आयुष्यात मी त्याला….”

WhatsApp Group

MS Dhoni On Deepak Chahar : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सहकारी खेळाडूंशी कोणताही संकोच न करता बोलण्यासाठी ओळखला जातो. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून त्याने अनेक खेळाडूंना तयार केले, त्यांच्या कलागुणांचा उत्तम वापर केला आणि त्यांना त्यांचे विचार मोकळेपणाने मांडण्याची संधी दिली. दीपक चहर हे त्यापैकीच एक. गेल्या काही हंगामांपासून सीएसकेकडून खेळत असलेल्या दीपकसोबत धोनीचे नाते भारी आहे. धोनी कधी मैदानात त्याला त्याच्या चुकीबद्दल फटकारताना दिसतो, तर कधी त्याच्याशी गप्पा मारताना दिसतो.

IPL 2023 च्या फायनलमध्ये दीपक चहर मैदानात सुस्त दिसत होता आणि त्याने काही झेल सोडले. CSK चॅम्पियन झाल्यानंतर दीपक त्याच्या टोपीवर धोनीचा ऑटोग्राफ घेण्यासाठी आला होता, तेव्हा धोनीने नकार दिला.

हेही वाचा – Business Idea : भारतात कडकनाथची जोरदार मागणी, सामान्य कोंबडीपेक्षा 4 पट महाग!

दीपकसोबतच्या नात्याबद्दल बोलताना धोनीने गंमतीने सांगितले की चहर त्याच्या आयुष्यात कधीच परिपक्व होताना दिसणार नाही. धोनी म्हणाला, ”दीपक चहर ड्रग्जसारखा आहे. जर तो तुमच्याजवळ नसेल, तर तो कुठे आहे असे तुम्हाला वाटत राहते. जर तो तुमच्या सोबत असेल तर तुम्ही विचार करता की तो इथे का आहे? चांगली गोष्ट अशी आहे की तो परिपक्व होत आहे परंतु समस्या ही आहे की त्याला यासाठी वेळ लागतो. माझ्या आयुष्यात, मी कदाचित त्याला मॅच्योर झालेला पाहू शकणार नाही.”

दीपक चहर हा आयपीएलमधील सीएसके संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे आणि संघाच्या शानदार कामगिरीमध्ये त्याचा मोलाचा वाटा आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment