IPL 2023 : यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामात खेळू शकणार नाही. आता दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल आयपीएल २०२३ साठी आपल्या कर्णधाराची घोषणा केली आहे. या हंगामात स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयपीएल २०२३ ३१ मार्चपासून सुरू होत आहे. BCCI चा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीला संघाचे संचालक बनवण्यात आले आहे.
दिल्ली कॅपिटल्सने ट्वीट केले की, ‘डेव्हिड वॉर्नर (कर्णधार) आणि अक्षर पटेल (उपकर्णधार), आयपीएल २०२३ मध्ये या दोन दमदार खेळाडूंच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स जोरात गर्जना करण्यास सज्ज आहे.’ डेव्हिड वॉर्नरने २०१३ मध्ये दोन सामन्यांत तत्कालीन दिल्ली डेअरडेव्हिल्सचे नेतृत्व केले होते.
🚨 ANNOUNCEMENT 🚨
Sourav Ganguly returns to Delhi Capitals as our Director of Cricket for #TATAIPL2023 🤝🏻
Welcome Back, Dada 💙❤️ @SGanguly99 pic.twitter.com/veUUc7fqBy
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 16, 2023
३६ वर्षीय वॉर्नरला यापूर्वी आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा अनुभव आहे. वॉर्नरच्या नेतृत्वाखालीच सनरायझर्स हैदराबादने (SRH) २०१६ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत वॉर्नरची कामगिरी तितकीशी चांगली नव्हती, पण एकदिवसीय मालिकेत फॉर्म मिळवल्यानंतर त्याला आयपीएलमध्ये प्रवेश करायला आवडेल.
POV: Imagining Captain Davey arriving at #QilaKotla via the nearest #DelhiMetro 🐯🚇
Dilli, it's time to roar together this #IPL2023 with David Warner (𝗖) ❤💙#YehHaiNayiDilli | @davidwarner31 pic.twitter.com/xzEoWhKyyR
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 16, 2023
हेही वाचा – Ginger Farming : दोन एकरात केली आल्याची शेती, कमावले १० लाख..! नंदुरबारच्या शेतकऱ्याची कमाल
डेव्हिड वॉर्नरने दिल्ली कॅपिटल्सकडून आतापर्यंत ६९ सामन्यांत १८८८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ३१.४६ होती. त्याच्या बॅटमधून दोन शतके आणि १५ अर्धशतके झळकली. एकूण आयपीएलमध्ये डेव्हिड वॉर्नरने १६२ सामन्यांमध्ये ४२.०१ च्या वेगाने ५८८१ धावा केल्या आहेत, ज्यात चार शतके आणि ५५ अर्धशतकांचा समावेश आहे.
दिल्ली कॅपिटल्सचे टॉप-५ फलंदाज
- ऋषभ पंत, ९८ सामने, २८३८ धावा
- वीरेंद्र सेहवाग, ८६ सामने, २३८२ धावा
- श्रेयस अय्यर, ८७ सामने, २३७५ धावा
- शिखर धवन, ६३ सामने, २०६६ धावा
- डेव्हिड वॉर्नर, ६९ सामने, १८८८ धावा
वॉर्नरचा आंतरराष्ट्रीय विक्रम
आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर वॉर्नरने आतापर्यंत १०३ कसोटी सामन्यांमध्ये ४५.५७ च्या सरासरीने ८१५८ धावा केल्या आहेत ज्यात २५ शतके आणि ३४ अर्धशतकांचा समावेश आहे.एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर या क्रिकेटपटूची १४१ सामन्यात ४५.१६ ची सरासरी आहे.त्याने ६००७ धावा केल्या आहेत. . एकदिवसीय सामन्यांमध्ये वॉर्नरच्या नावावर १९ शतके आणि २७ अर्धशतके आहेत. वॉर्नरने ऑस्ट्रेलियासाठी ९९ टी-२० सामनेही खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर २८९४ धावा आहेत. वॉर्नरने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये एक शतक आणि २४ अर्धशतके झळकावली आहेत.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!