नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरने सर्वांना चकित केले. वॉर्नरने कसोटीच्या फॉर्मेटबाबत आधीच निवृत्ती जाहीर केली होती. पाकिस्तानविरुद्धचा शेवटचा कसोटी सामना त्याचा निरोप सामना असेल. पण या सामन्याच्या 3 दिवस आधी वॉर्नरने (David Warner ODI Retirement) वनडेमधूनही निवृत्ती जाहीर केली. वॉर्नरने आपल्या जवळपास 15 वर्षांच्या वनडे कारकिर्दीत ऑस्ट्रेलियन क्रिकेटची मोठी सेवा केली. पण गरज भासल्यास तो देशासाठी उपलब्ध राहू शकतो, असे त्याने सांगितले.
”मला कुटुंबाला काहीतरी परत द्यायचे आहे आणि त्या आधारावर मी निश्चितपणे एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेत आहे. 2023 च्या विश्वचषकादरम्यान मी ही गोष्ट सांगितली होती, यावर मात करणे आणि भारतात जिंकणे ही माझ्या मते मोठी उपलब्धी आहे. मी आज त्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेईन, ज्यामुळे मला जगभरातील काही इतर टी-20 लीगमध्ये जाऊन खेळता येईल”, असे डेव्हिड वॉर्नरने सांगितले.
हेही वाचा – विमानाचा रंग पांढराच का असतो? काळ्या रंगाची विमाने का नसतात?
डेव्हिड वॉर्नरने आयसीसी स्पर्धेत पुनरागमन करण्याचे संकेत दिले. तो म्हणाला, ”मला माहीत आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी येत आहे. जर मी दोन वर्षांच्या कालावधीत चांगले क्रिकेट खेळत असेल आणि मी जवळपास आहे. जर कोणाला गरज असेल तर मी उपलब्ध आहे.”
डेव्हिड वॉर्नरने 2023 च्या वर्ल्डकपमध्ये 2 शतके आणि 2 अर्धशतकांच्या मदतीने 500 हून अधिक धावा केल्या होत्या. 2017 पासून चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली गेली नाही. आता त्याचे यजमानपद 2025 मध्ये पाकिस्तानला मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाला वॉर्नर परत मिळतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!