मुंबई : यावेळी भारतीय वेटलिफ्टर्सनी कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे. स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू यात खास आहे. २२व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिनं देशाला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. मीराबाईचे चाहते फक्त सामान्य लोकच नाहीत तर ‘थॉर’ म्हणजेच हॉलिवूड चित्रपटाचा नायक ख्रिस हेम्सवर्थही आहे. ‘थॉर’नं मीराबाईचं कौतुक करत एक ट्वीट केलं आहे.
काय म्हणाला ‘थॉर’?
आपल्या एका ओळीच्या कॅप्शनमध्ये ख्रिस हेम्सवर्थनं मीराबाईंना लीजेंड म्हटलं आहे. हेम्सवर्थनं लिहिलं, ”She is worthy..! अभिनंदन, मीराबाई, तुम्ही एक लीजेंड आहात.” मीराबाई चानूनं इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे २२व्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये महिलांच्या वेटलिफ्टिंग ४९ किलो गटात भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं. मीराबाईनं स्नॅचमध्ये ८८ किलो वजन उचललं. त्याचवेळी तिनं क्लीन अँड जर्कमध्ये ११३ किलो वजन उचलण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला. म्हणजेच मीराबाईने एकूण २०१ किलो वजन उचललं. हा कॉमनवेल्थ गेम्समध्ये एक विक्रम आहे.
She is worthy! Congrats, Saikhom, you legend.
— Chris Hemsworth (@chrishemsworth) August 4, 2022
हेही वाचा – दारू पिल्यानंतर लोक इंग्रजी का बोलू लागतात?
मीराबाई चानूनं गोल्ड कोस्ट येथे झालेल्या २०१८च्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही सुवर्णपदक जिंकलं होतं. यासोबतच तिनं २०१४च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्यपदक जिंकलं होतं. आता बर्मिंगहॅम गेम्समध्ये तिनं चमकदार कामगिरी करून दिग्गजांना कौतुक करण्यास भाग पाडलं आहे.
मीराबाईनं ऑलिम्पिकमध्येही फडकवलाय झेंडा!
मीराबाईच्या कारकिर्दीतील सर्वात ऐतिहासिक क्षण आला जेव्हा तिनं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ४९ किलो वजनी गटात भारतासाठी रौप्यपदक जिंकलं. यासह मीराबाई ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय वेटलिफ्टर ठरली. त्या ऑलिम्पिकमध्ये स्नॅचनंतर मीराबाई दुसऱ्या क्रमांकावर होती. यानंतर मीराबाईनं क्लीन अँड जर्कच्या पहिल्या प्रयत्नात ११० किलो तर दुसऱ्या प्रयत्नात ११५ किलो वजन उचलण्यात यश मिळवलं.
हेही वाचा – कमाईवाली शेती..! तुळशीचं उत्पन्न म्हणजे कमी गुतंवणूक जास्त नफा; वाचा सविस्तर!
सर्वात महागडा चित्रपट!
मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या आतापर्यंत रिलीज झालेल्या सोलो थॉर चित्रपटांपैकी ‘थॉर: लव्ह अँड थंडर’ हा चित्रपट सर्वात महागडा चित्रपट आहे. अमेरिकेत एक दिवस आधी भारतात प्रदर्शित झालेला ‘थॉर: लव्ह अँड थंडर’ हा चित्रपट इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी हा चित्रपट देशभरातील २८०० स्क्रीन्सवर दाखवण्यात आला. ‘जर्नी इन मिस्ट्री’ या कॉमिक बुकमधून थॉरच्या पात्रानं १९६२ मध्ये मार्वल कॉमिक्समध्ये प्रवेश केला आणि हे पात्र पहिल्यांदा २०११मध्ये चित्रपटाच्या पडद्यावर दिसलं. ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या ख्रिस हेम्सवर्थनं गेल्या ११ वर्षांत या व्यक्तिरेखेसोबत जो प्रवास केला त्याचा प्रभाव दोघांवरही आहे.