मुंबई : कॉमनवेल्थ (Commonwealth Games 2022) गेम्समध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने एकतर्फी सामन्यात पाकिस्तानचा (IND vs PAK) ८ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं ९९ धावा केल्या. भारतीय संघानं हे लक्ष्य ११.४ षटकांत पूर्ण केले. भारताच्या विजयात स्मृती मानधना चमकली. तिनं ४२ चेंडूत ६३ धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीत तिनं ८ चौकार आणि ३ षटकार मारले. महिला टी-२० संघाची कर्णधार म्हणून हरमनप्रीतसाठीही हा सामना खास होता. कर्णधार म्हणून तिनं ४२वा टी-२० सामना जिंकला.
पाकिस्तानी खेळाडूला गिफ्ट!
भारतासाठी एकंदरीत (महिला आणि पुरुष) दोन्हीमध्ये सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारी ती पहिली कर्णधार बनली. तिनं महेंद्रसिंह धोनीला मागं सोडलं. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं ७१ पैकी ४२ सामने जिंकले. विक्रमी विजयानंतर हरमनप्रीत कौरनंही मनं जिंकली. तिनं आपली बॅट पाकिस्तानी क्रिकेटपटूला भेट दिली. स्टार फलंदाजाकडून बॅट मिळाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूच्या आनंदाला पारावार उरला नाही. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघातील खेळाडूंनी हरमनप्रीतच्या औदार्याचं कौतुक केलं.
धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं ७१ सामने खेळले ज्यात टीम इंडियाला २८ सामन्यांमध्ये ४१ विजयांसह पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडं, हरमनप्रीत कौरच्या कर्णधारपदाबद्दल बोलायचं झाल्यास, तिच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं ७१ सामन्यांमध्ये ४२ विजय नोंदवले आहेत, तर २६ सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Nice gesture from Indian women captain Harmanpreet Kaur she has given her bat to Pakistan women player after commonwealth games match. #INDvsPAK pic.twitter.com/pwT0zNtrz2
— DD Sports (@Mahesh13657481) July 31, 2022
हेही वाचा – आज १ ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ नियम! तुम्हाला माहिती आहेत का?
Harmanpreet Kaur equals MS Dhoni’s record for most T20I victories as an Indian captain.#CricTracker #MSDhoni #HarmanpreetKaur #CWG2022 #CricketTwitter pic.twitter.com/v8EvYBHo8r
— CricTracker (@Cricketracker) August 1, 2022
भारताचा सामना बार्बाडोसशी!
पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवल्यानंतरही भारत कॉमनवेल्थ गेम्समध्ये उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत कायम आहे. आता भारतीय महिला संघाचा पुढील सामना बार्बाडोसशी होणार आहे. आता भारत आणि बार्बाडोस यांच्यातील सामना बाद फेरीसारखा झाला आहे. म्हणजेच आता हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित करेल.