IPL 2023 Final GT vs CSK : आयपीएलच्या 16व्या हंगामाचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज (28 मे) होणार होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले होते, पण पावसाने केलेल्या कहरामुळे सामना होऊ शकलेला नाही. आता उद्या याच मोदी स्टेडियमवर हाच सामना रंगेल. चेन्नई पाचव्यांदा तर गुजरात सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी उचलण्याचा प्रयत्न करेल.
याआधी समालोचक सायमन डुल यांच्याशी बोलताना पंच नितीन मेनन आणि रॉड टकर म्हणाले, “रात्री नऊच्या सुमारास परिस्थिती चांगली होती. तीन तासांच्या पावसानंतरही आम्ही खूप आशावादी होतो पण दुर्दैवाने पाऊस पुन्हा आला. आम्ही रात्री उशिरा 12:06 पर्यंत सामना सुरू करू शकतो. मैदान आणि खेळपट्टी कोरडी करण्यासाठी ग्राउंड्समनला किमान एक तास लागतो. रात्री 11 वाजेपर्यंत पाऊस थांबला नाही तर उद्या (सोमवारी) पुन्हा येऊ.”
हेही वाचा – IPL 2023 Final : आशिष नेहराने मोडला नियम! मोहित, राशिदला ट्रिपल सीट घेत…
The Umpires are here with the latest update on the rain delay 🌧️
Hear what they have to say 👇 #TATAIPL | #CSKvGT | #Final pic.twitter.com/qG6LVj4uvh
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2023
The #Final of the #TATAIPL 2023 has been moved to the reserve day on 29th May – 7:30 PM IST at the Narendra Modi Stadium, Ahmedabad.
Physical tickets for today will be valid tomorrow. We request you to keep the tickets safe & intact. #CSKvGT pic.twitter.com/d3DrPVrIVD
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2023
CSK Vs GT:
IPL 2023 Final has been shifted and will take place tomorrow. pic.twitter.com/lNOLVkXGf1
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 28, 2023
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!