IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जचा ‘स्टार’ खेळाडू आयपीएलमधून बाहेर!

WhatsApp Group

IPL 2024 | इंडियन प्रीमियर लीगचा नवा हंगाम सुरू होण्याआधीच चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा धडाकेबाज सलामीवीर स्पर्धेतून बाहेर पडणार हे निश्चित मानले जात आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेदरम्यान न्यूझीलंडचा सुपरस्टार डेव्हॉन कॉनवे जखमी झाला होता. आता त्याच्या शस्त्रक्रियेची बातमी समोर आली असून, त्यानंतर तो मेपर्यंत मैदानापासून दूर राहणार आहे. कॉनवेने गेल्या दोन मोसमात चेन्नई संघासाठी शानदार फलंदाजी केली होती.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील आयपीएल फ्रेंचायझी संघ चेन्नई सुपर किंग्जला नवीन हंगामापूर्वी मोठा झटका बसला आहे. संघाचा विश्वसनीय सलामीवीर न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे याला स्पर्धेपूर्वी अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे मेपर्यंत मैदानाबाहेर बसावे लागले आहे. गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत तो जायबंदी झाला होता. यानंतर वैद्यकीय पथकाने त्याच्यावर लक्ष ठेवले आणि शेवटी शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला.

न्यूझीलंडने डेव्हॉन कॉनवेबाबत माहिती शेअर केली. कॉनवेची दुखापत गंभीर असून त्याला पुढील आठवड्यात शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहे. त्याच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली असून शस्त्रक्रियेनंतर त्याला 8 आठवडे मैदानाबाहेर राहावे लागेल.

हेही वाचा – लोकसभा निवडणूक : भाजपच्या पहिल्या लिस्टमधून 195 उमेदवारांची नावे जाहीर, वाचा

न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवेने गेल्या मोसमात चेन्नईसाठी दमदार सलामी दिली होती. 1 कोटी रुपये देऊन संघात समाविष्ट केलेल्या या फलंदाजाने 16 सामने खेळताना 6 अर्धशतके झळकावत एकूण 672 धावा केल्या होत्या. या काळात त्याची 92 धावांची नाबाद खेळी सर्वोत्तम ठरली. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर होता. चेन्नईसाठी आतापर्यंत 23 सामने खेळलेल्या कॉनवेने एकूण 924 धावा केल्या आहेत ज्यात 48 च्या सरासरीने 9 अर्धशतक खेळी आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment