बधाई हो..! CSK चा खेळाडू दुसऱ्यांदा बनला बाप; शेअर केली गोड बातमी

WhatsApp Group

Ambati Rayudu : आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघ प्लेऑफमध्ये खेळण्याची आशा करत आहे. दरम्यान, चेन्नईच्या एका खेळाडूने गोड बातमी शेअर केली आहे. चेन्नईचा फलंदाज अंबाती रायुडू आणि त्याच्या कुटुंबासाठी मंगळवार (16-05-23) हा खूप खास दिवस ठरला आहे. अंबाती रायुडू आणि त्याची पत्नी चेन्नापल्ली विघा दुसऱ्यांदा आई-वडील झाले आहेत. दोघेही दुसऱ्यांदा गोंडस मुलीचे पालक झाले आहेत.

रायुडूने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. बाळाचा फोटो पोस्ट करत रायुडूने लिहिले की, “मुली या खरंच वरदान असतात.”

चेन्नईनेही या अप्रतिम प्रसंगी ट्वीट करत म्हटले, “सुपर डॅडीचा आनंद द्विगुणित झाला. अंबाती रायुडू आणि त्याच्या कुटुंबाचे अभिनंदन.” रायडू आणि विघा यांचा विवाह 14 फेब्रुवारी 2009 रोजी झाला.

हेही वाचा – कॉन्टॅक्ट लेन्स वापरताय? होऊ शकतो कॅन्सर! धक्कादायक बाब आली समोर!

आयपीएलमध्ये रायुडू मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. त्याच्या नावावर एकूण टी-20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम रेकॉर्ड आहे. त्याने 288 सामन्यांच्या 268 डावांमध्ये 27 च्या सरासरीने 5992 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 100 धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 124 राहिला आहे. त्याने 200 हून अधिक षटकारही मारले आहेत. आयपीएल रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर रायुडूने 200 मॅचमध्ये 4312 धावा केल्या आहेत. एक शतक आणि 22 अर्धशतके ठोकली आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment