IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीविषयी विधान केले आहे. चहर म्हणाला, धोनी आयपीएल २०२३ नंतरही खेळत राहू शकतो. आयपीएलच्या या सीझनमध्ये लोक धोनीला शेवटचा खेळताना पाहतील याची शाश्वती नाही. लीगमधील माहीचे हे शेवटचे वर्ष असेल असे कोणीही सांगितलेले नाही.
चेन्नई सुपर किंग्जला आपल्या कर्णधारपदाखाली ४ वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या धोनीच्या आयपीएल कारकिर्दीची सध्या बरीच चर्चा आहे. यावर सीएसकेचा गोलंदाज दीपक चहर म्हणाला की, धोनीच्या निवृत्तीबाबत आम्हाला काहीही माहिती नाही. त्याने जमेल तेवढे खेळावे अशी आमची इच्छा आहे. धोनीला कधी निवृत्ती घ्यावी लागेल हे सांगण्याची गरज नाही.
दीपक चहरने सांगितले की, धोनीला माहीत आहे की त्याला कोणता निर्णय घ्यायचा आहे. कसोटी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जेव्हा त्याने निवृत्ती घेतली तेव्हा त्याच्याबद्दल कोणालाच माहिती नव्हती हे आपण पाहिले आहे. मला आशा आहे की तो खेळत राहील. २०१८ पासून चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग असलेला दीपक चहर म्हणाला, धोनी सध्या चांगल्या स्थितीत आहे. जेव्हा तो आयपीएलमध्ये फलंदाजी करेल तेव्हा सर्वांना ते जाणवेल.
हेही वाचा – बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी अलर्ट..! २४ मार्चपर्यंत पूर्ण करा ‘हे’ काम; नाहीतर…
गेल्या मोसमात CSK 9व्या क्रमांकावर
RCB, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जसह चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल 2023 मध्ये ब गटात स्थान मिळाले आहे. आयपीएलचा शेवटचा हंगाम सीएकेसाठी खूप वाईट होता, जिथे लीग फेरीनंतर ते पॉइंट टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर होते. चेन्नईने 2021 मध्ये आयपीएलचे शेवटचे विजेतेपद जिंकले होते.
गेल्या मोसमातील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खराब कामगिरी केल्यानंतर, रवींद्र जडेजाकडून कर्णधारपदाची सूत्रे घेतल्यानंतर धोनीकडे पुन्हा संघाची कमान सोपवण्यात आली होती. 2008 मध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून धोनी चेन्नईसोबत आहे. 2016 मध्ये, जेव्हा CSK वर 2 वर्षांची बंदी घालण्यात आली तेव्हा धोनी रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!