MS Dhoni Meets The Elephant Whisperers Team : आयपीएल 2023 मधील दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या (CSK vs DC) सामन्यापूर्वी, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी ऑस्कर विजेता भारतीय माहितीपट , ‘द एलिफंट व्हिस्पर्स’च्या लोकांना आणि दिग्दर्शकाला भेटताना आणि त्यांचा सत्कार करताना दिसला. बोमन, बेली आणि चित्रपट दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस यांची धोनीने भेट घेतली.
धोनीने अभिनेता बोमन आणि बेली आणि चित्रपटाचे दिग्दर्शक कार्तिक गोन्साल्विस यांना सात क्रमांकाची विशेष जर्सी दिली. चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर या क्षणांचे फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत ज्यात धोनी बोमन, बेली आणि कार्तिकी यांचा सत्कार करताना आणि चित्रपटाच्या कलाकारांना भेटताना दिसत आहे.
Thala Dhoni welcomed the elephant whisperers to Chepauk 🐘💛
(📸 via @ChennaiIPL) #IPL2023 pic.twitter.com/6aJxffsHvu
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 10, 2023
हेही वाचा – ‘या’ गावात बाहेरील श्रीमंत लोक येऊन स्थायिक झाले, गावकरी हाकलले गेले!
Tudumm 🎬 Special occasion with very special people 💛🐘#WhistlePodu #Yellove 🦁 pic.twitter.com/AippVaY6IO
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 10, 2023
“द एलिफंट व्हिस्पर्स” काय आहे?
कार्तिकी गोन्साल्विस दिग्दर्शित “द एलिफंट व्हिस्पर्स” ही ऑस्कर विजेती डॉक्युमेंटरी आहे, जी रघू या हत्तीच्या बाळाची काळजी घेणाऱ्या बोमन आणि बेली या वृद्ध जोडप्याची कथा सांगतो. ही डॉक्युमेंटरी कार्तिक गोन्साल्विसचे दिग्दर्शक म्हणून पदार्पण होते.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!