सलमान खानला इग्नोर करणारा पहिला माणूस…ख्रिस्तियानो रोनाल्डो! पाहा Video

WhatsApp Group

Cristiano Ronaldo Ignored Salman Khan Video : बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘टायगर 3’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हे पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, सलमान खान नुकताच टायसन फ्युरी आणि फ्रान्सिस नगानौ यांच्यातील बॉक्सिंग सामना पाहण्यासाठी सौदी अरेबियातील रियाध येथे आला होता. फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज त्याच्यासोबत तिथे उपस्थित होते.

या सेलिब्रिटींचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये, रोनाल्डो कसा सलमानला इग्नोर करतो हे दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यूजर्स या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

हेही वाचा – डायमंडचे देशातील सर्वात मोठे क्लस्टर नवी मुंबईत!

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बॉक्सिंग मॅच संपल्यानंतर रोनाल्डो त्याच्या गर्लफ्रेंडचा हात धरून पुढे सरकत आहे, तर समोरून सलमान खान येतो, पण रोनाल्डो त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे सरकतो. याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

सलमान खानचा ‘टायगर 3’ कधी रिलीज होतोय?

सलमान खानचा ‘टायगर 3’ दिवाळीच्या मुहूर्तावर 12 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात सलमान खान व्यतिरिक्त कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment