दुसऱ्या महायुद्धात हेरगिरी करणाऱ्या, 110 वर्षे जगलेल्या इंटरनॅशनल क्रिकेटरची गोष्ट!

WhatsApp Group

दुसऱ्या महायुद्धात जगातील कोट्यवधी निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. 1 सप्टेंबर 1939 ते 2 सप्टेंबर 1945 अशा सुमारे सहा वर्षे चाललेल्या या महायुद्धात 7-8 कोटी लोक मारले गेले. या युद्धादरम्यानचे अनेक किस्से आपण ऐकत असतो. या युद्धात सहभागी झालेली एक महिला क्रिकेटरही होती. एलिन अॅश (Cricketer Eileen Ash In Marathi) असे या ब्रिटिश महिला क्रिकेटरचे नाव होते. एलिन यांना वयाच्या 18 व्या वर्षी नागरी सेवेत नियुक्ती मिळाली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटनच्या गुप्त गुप्तचर सेवा MI6 (मिलिटरी इंटेलिजन्स, सेक्शन 6) साठीही त्यांनी काम केले.

सर्वात जुन्या गुप्तचर संस्थांपैकी एक असलेली MI6 1909 मध्ये स्थापन करण्यात आली होती. या संस्थेत एलिन यांनी जवळपास 11 वर्षे काम केले. एलिन यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात जगाचा निरोप घेतला. त्यावेळी एलिन यांचे वय 110 वर्षे 34 दिवस होते. त्या सर्वाधिक काळ जगणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरल्या. लंडनमध्ये जन्मलेल्या एलिन यांनी 2017 च्या महिला वर्ल्डकप फायनलपूर्वी बेल देखील वाजवली होती, ज्यामध्ये इंग्लंडने भारताचा रोमहर्षक सामन्यात पराभव केला होता. त्यावेळी एलिन 105 वर्षांच्या होत्या, यावरून त्यांचे क्रिकेटवरील प्रेम दिसून येते.

आंतरराष्ट्रीय विक्रम

एलिन उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करायच्या. त्यांनी दुसऱ्या महायुद्धापूर्वी आणि नंतर इंग्लंडकडून सात कसोटी सामने खेळले. या काळात त्यांनी 23 च्या सरासरीने 10 विकेट घेतल्या. त्यांनी 1937 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले होते. 1949 मध्ये ऍशेस दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाला गेलेल्या संघाचा त्या भाग होत्या. याशिवाय त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये ‘सिव्हिल सर्व्हिस वुमन’, ‘मिडलसेक्स वुमन’ आणि ‘साउथ वुमन’चे प्रतिनिधित्व केले.

हेही वाचा – युरिक अॅसिडचा त्रास Free मध्ये दूर होऊ शकतो, डॉक्टर काय म्हणतायत बघा!

एलिन यांची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी 1949 मध्ये व्हिक्टोरिया कंट्री इलेव्हन विरुद्धच्या टूर मॅचमध्ये झाली. त्या सामन्यात त्यांनी अष्टपैलू चमक दाखवत नाबाद शतक झळकावले आणि पाच बळी घेतले. त्यामुळे इंग्लंडला 170 धावांचा सहज विजयही मिळाला. 1949 मध्ये त्यांची सिडनीतील फ्रेंच रेस्टॉरंटमध्ये ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांच्याशी भेट झाली. ब्रॅडमन यांनी त्यांना स्वाक्षरी केलेली बॅट दिली.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment