क्रिकेटर अंबाती रायुडूने 10 दिवसात सोडलं राजकारण, पक्षातून बाहेर!

WhatsApp Group

भारतासाठी तिन्ही क्रिकेट फॉरमॅट खेळलेल्या अंबाती रायुडूने (Ambati Rayudu Quits Politics) राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यातच त्याने वायएसआर काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला होता. 38 वर्षीय रायुडूने 28 डिसेंबर 2023 रोजी आंध्र प्रदेशमधील जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षात प्रवेश केला होता. आज 6 जानेवारीला त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

अंबाती रायुडूने सोशल मीडिया पोस्टद्वारे वायएसआर काँग्रेस पार्टी सोडण्याची घोषणा केली. ”प्रत्येकाला कळवत आहे की मी YSRCP पक्ष सोडण्याचा आणि काही काळ राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे जे काही होईल त्याची माहिती मी शेअर करेन. धन्यवाद.”

रायुडूच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सुरू झाली होती. तो शेवटी कोणत्या पक्षात जाणार याबाबत राजकारणात सस्पेंस कायम ठेवला होता. गेल्या वर्षी मे-जूनमध्ये जगन मोहन रेड्डी यांच्यासोबत झालेल्या अनेक बैठकांनंतर तो मोहम रेड्डी यांच्या पक्षात सामील होणार असल्याचे स्पष्ट झाले. रायुडूने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला होता. मुख्यमंत्र्यांनी रायुडूचे पक्षात स्वागत केले होते.

हेही वाचा – तुम्हाला माहितीये, LPG सिलिंडर बुक करताच मिळतो 50 लाखांचा विमा!

अंबाती रायुडू भारतीय क्रिकेट संघात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळला. त्याने मे 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 2019 च्या विश्वचषकात टीम इंडियाच्या संघात स्थान न मिळाल्याने त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. निवृत्तीनंतर लगेचच तो राजकारणात येणार, अशा बातम्या समोर आल्या. जून 2023 मध्ये, वायएसआरसीसाठी तो आगामी लोकसभा निवडणूकही लढवू शकतो, अशा बातम्या आल्या होत्या. मात्र, तसे झाले नाही. रायुडूच्या क्रिकेट करिअरची सुरुवात हैदराबादमधून झाली होती. 2004 मध्ये, तो अंडर-19 विश्वचषक भारतीय संघाचा कर्णधार होता.

अंबाती रायुडूने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील इंडियन प्रीमियर लीग संघ चेन्नई सुपर किंग्जकडून शेवटचा सामना खेळला. 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव करून पाचव्यांदा विजेतेपद पटकावले. या अंतिम सामन्यापूर्वी रायुडूने निवृत्ती जाहीर केली होती. रायुडूच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 203 सामने खेळताना 4348 धावा केल्या. आयपीएलमध्येही त्याच्या नावावर शतक आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment