“मला तिकीटांसाठी विचारू नका, तुमच्या घरीच…”, विराट कोहलीची मित्रांना कळकळून विनंती!

WhatsApp Group

Virat Kohli On Cricket World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भारतात वर्ल्डकरप होत असल्याने सर्वांनाच तो स्टेडियममध्ये पाहायचा आहे. भारतीय क्रिकेटपटूंचे मित्र, नातेवाईक तिकीट किंवा पाससाठी त्यांच्याकडे विचारणा करतात. याच कोंडीत विराटही अडकला आहे. मात्र विश्वचषकापूर्वी त्याने आपल्या मित्रांना विश्वचषकाच्या तिकिटांसाठी विनंती करू नये आणि घरी बसून विश्वचषक पाहावा, अशी विनंती केली आहे.

विराट कोहलीने (Virat Kohli News In Marathi) आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले आहे की, “जसे जसे आपण विश्वचषक जवळ येत आहोत, तसतसे मी माझ्या सर्व मित्रांना नम्रपणे सांगू इच्छितो की संपूर्ण स्पर्धेदरम्यान मला तिकिटांसाठी अजिबात विनंती करू नका. कृपया घरीच राहा. त्याचा आनंद घ्या.” त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने लिहिले, “आणि मला यात काहीतरी जोडायचे आहे… जर तुम्हाला तुमच्या मेसेजचे उत्तर मिळाले नाही तर कृपया मलाही विनंती करू नका. समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.”

हेही वाचा – Success Story : पहिल्या 4 प्रयत्नांत अपयशी ठरला, पण शेतकऱ्याचं पोरगं हरलं नाही!

भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. त्याच वेळी, विश्वचषक 2023 उद्यापासून म्हणजेच गुरुवार 5 ऑक्टोबर रोजी सुरू होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना होणार आहे. या विश्वचषकासाठी विराट कोहली पूर्णपणे तयार आहे. हा विश्वचषक त्यांच्यासाठी शेवटचा एकदिवसीय विश्वचषक ठरू शकतो. अशा परिस्थितीत ते संस्मरणीय बनवायला आवडेल.

विश्वचषकासाठी भारतीय संघ (Cricket World Cup 2023)

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप-कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रवीचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment