Naveen Ul Haq ODI Retirement : विराट कोहलीसोबत मैदानावर भांडलेल्या अफगाणिस्तानच्या नवीन उल हकने वयाच्या 24व्या वर्षी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल 2023 दरम्यान या वेगवान गोलंदाजाचे कोहलीसोबत भांडण झाले होते. नवीन उल हकने 2023 च्या विश्वचषकानंतर (Cricket World cup 2023) एकदिवसीय क्रिकेट सोडण्याची घोषणा केली आहे. आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या नवीनचा कोहलीसोबत मैदानावर वाद झाला. संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरचा नवीनला या भांडणात पाठिंबा मिळाला. त्यामुळे नवीन उल हक आणि विराट कोहली शेवटच्या वेळी एकदिवसीय विश्वचषकात भिडताना दिसणार आहेत.
नवीन उल हकने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्तीची घोषणा केली. सोशल मीडियावर त्याने म्हटले, ”देशाचे प्रतिनिधित्व करणे हा सन्मान आहे. विश्वचषक 2023 नंतर मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. मी अफगाणिस्तानसाठी टी-20 खेळत राहीन. हा निर्णय घेणं सोपं नाही, पण करिअर लांबवण्यासाठी हा कठीण निर्णय घ्यावा लागला. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड आणि चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मी त्यांचे आभार मानतो.”
हेही वाचा – IND Vs AUS : काय झालं हे कुणालाच कळलं नाही, पण रोहित शर्मा OUT झाला होता! पाहा Video
आयपीएल 2023 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यादरम्यान विराट कोहलीचा नवीन उल हकसोबत वाद झाला होता. सामना संपल्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये हस्तांदोलन करताना वाद झाला. यानंतर गौतम गंभीर नवीन उल हकच्या बाजूने उभा राहिला. यानंतर आयोजकांनी कोहली आणि गंभीरवर दंडही ठोठावला होता. कपिल देव ते सुनील गावसकर यांसारख्या दिग्गजांचे मत होते की खेळाडूंवर बंदी घातली पाहिजे.
नवीनची कारकीर्द (Naveen Ul Haq ODI Retirement )
वेगवान गोलंदाज नवीन उल हक जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळत आहे. त्याने आतापर्यंत 7 एकदिवसीय सामने खेळले असून 25 च्या सरासरीने 14 बळी घेतले आहेत. 42 धावांत 4 बळी ही सर्वोत्तम कामगिरी आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवीनने 27 सामन्यात 21 च्या सरासरीने 34 विकेट घेतल्या आहेत. 21 धावांत 3 बळी ही सर्वोत्तम कामगिरी आहे. एकूण 145 टी-20 सामन्यात त्याने 175 विकेट घेतल्या आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!