World Cup 2023 ENG vs NZ : वर्ल्डकपचा पहिला टॉस, केन विल्यमसन संघाबाहेर!

WhatsApp Group

Cricket World Cup 2023 ENG vs NZ In Marathi : विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. कर्णधार टॉम लॅथम म्हणाला की, आम्हाला लक्ष्याचा पाठलाग करायला आवडेल. अहमदाबादमध्ये झालेल्या शेवटच्या 5 वनडे सामन्यात 3 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. अशा स्थितीत जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाला येथे मोठी धावसंख्या उभारायची आहे. न्यूझीलंडचा स्टार खेळाडू केन विल्यमसन आणि वेगवान गोलंदाज टिम साऊदी हा सामना खेळत नाहीये. संघासाठी हा मोठा धक्का आहे.

इंग्लंडने नुकतेच घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडचा 3-1 असा पराभव केला. अशा स्थितीत जोस बटलरच्या नेतृत्वाखालील संघाला या कामगिरीची पुनरावृत्ती करायला आवडेल. सलामीवीर फलंदाज डेव्हिड मलानने 3 डावात एक शतक आणि 2 अर्धशतकांच्या मदतीने मालिकेत सर्वाधिक 277 धावा करण्यात यश मिळवले. त्याला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कारही मिळाला. अशा स्थितीत मालनला पुन्हा एकदा या कामगिरीची पुनरावृत्ती करायला आवडेल. बेन स्टोक्सने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. मात्र, सलामीच्या सामन्यातील त्याच्या सहभागावर साशंकता आहे. डॅरिल मिशेलने या मालिकेत न्यूझीलंडकडून सर्वाधिक 196 धावा केल्या. एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले.

हेही वाचा – गुलाबाची शेती करून शेतकरी होतोय मालामाल, वर्षाला मिळतायत 8-9 लाख!

डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टकडून न्यूझीलंडला चांगल्या कामगिरीची आशा असेल. त्याने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत फक्त 2 सामने खेळले आणि 11 च्या सरासरीने 8 विकेट घेतल्या. सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 51 धावांत 5 बळी. 2019 च्या विश्वचषकातही बोल्टची कामगिरी उत्कृष्ट होती. दोन्ही संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या शेवटच्या 10 एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, इंग्लंडने 4 सामने जिंकले आहेत, तर किवी संघ 5 सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. एक सामना बरोबरीत राहिला. इंग्लंडने 2019 विश्वचषकाची अंतिम फेरी बरोबरीनंतर चौकार मोजण्याच्या नियमानुसार जिंकली.

दोन्ही संघांची Playing 11 (World Cup 2023 ENG vs NZ)

इंग्लंड – जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (विकेटकीपर/कप्तान), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड.

न्यूझीलंड – डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर/कप्तान), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment