Cricket Record : कशाला खेळतात हे..! फक्त ६ धावांवर ऑलआऊट झाला संघ; ८ फलंदाज शून्यावर!

WhatsApp Group

Cricket Record : ईशान्येचे संघ भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये इतर संघांशी स्पर्धा करण्यात अपयशी ठरत आहेत आणि याची उदाहरणे आपल्याला एकदा नाही तर वारंवार मिळत आहेत. अलीकडेच रणजी ट्रॉफीमध्येही आपण पाहिले आहे की तामिळनाडूने अरुणाचल प्रदेशला पराभूत केले होते. आता अशी बातमी आली आहे, जी क्रिकेट प्रेमींना विशेषतः भारतीय क्रिकेट प्रेमींना आवडणार नाही.

क्रिकेटच्या मैदानावर एकापेक्षा एक छोटे-मोठे विक्रम झाले असले तरी आता विजय मर्चंट ट्रॉफी (१६ वर्षांखालील स्पर्धेत) असा लाजिरवाणा विक्रम पाहायला मिळाला आहे ज्याने चाहत्यांना हादरवून सोडले आहे. विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये सिक्कीमचा अंडर-१६ संघ अवघ्या ६ धावांत ऑलआऊट झाला आणि एवढेच नाही तर सिक्कीमचा संघ पहिल्या डावातही केवळ ४३ धावा करू शकला. सिक्कीमचे हे हाल करत मध्य प्रदेशने सामना सहज जिंकला.

हेही वाचा – Bank Holidays January 2023 : जानेवारीत १४ दिवस बँका बंद..! ‘अशी’ आहे सुट्ट्यांची यादी

या सामन्यात मध्य प्रदेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना मध्य प्रदेशच्या फलंदाजांनी सिक्कीमच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला आणि पहिल्या डावात स्कोअरबोर्डवर ४१४ धावा केल्या. मध्य प्रदेशने ८ गड्यांच्या मोबदल्यात ४१४ धावा करून डाव घोषित केला. यानंतर सिक्कीमचा संघ पहिल्या डावात अवघ्या ४३ धावांवर गारद झाला.

८ फलंदाज शून्यावर

येथून या सामन्याचा निकाल स्पष्ट झाला, पण सिक्कीमचा संघ दुसऱ्या डावात असा लाजिरवाणा विक्रम करेल, असे कुणालाही वाटले नसेल. दुसऱ्या डावात सिक्कीमचा संघ अवघ्या ६ धावांत सर्वबाद झाला आणि यादरम्यान ८ फलंदाज खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. सिक्कीमसाठीच्या या ६ धावांमध्ये यष्टीरक्षक अवनीशने ४ धावांचे योगदान दिले तर अक्षयने २ धावा केल्या. तर मध्य प्रदेशकडून गिरीराज शर्माने ५ आणि अलिफ हसनने ४ विकेट्स घेतल्या.

यासह जवळपास २१२ वर्षे जुना विक्रम मोडला गेला आहे. यापूर्वी हा लज्जास्पद विक्रम द बीएसच्या नावावर होता. बीएस संघ १२ जून १८१० रोजी इंग्लंडविरुद्ध ६ धावांत ऑलआऊट झाला होता.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment