

RCB Jersey In Maha Kumbh 2025 : प्रयागराजमधील महाकुंभाचा उत्साह भाविकांमध्ये पसरला आहे आणि दररोज लाखो भाविक त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी येत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एका चाहत्याने आरसीबीची जर्सी आणली आणि पाण्यात बुडवली. हा चाहता आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची जुनी जर्सी घेऊन आला होता, जी लाल आणि काळ्या रंगाच्या मिश्रणात बनवली होती.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हा चाहता एका साधूसोबत आंघोळ करताना दिसत आहे. प्रथम, दोघांनीही आरसीबी जर्सीसह फोटो काढला आणि नंतर चाहत्याने एकदा, दोनदा नाही तर सात वेळा जर्सी पाण्यात बुडवली. सोशल मीडियावरील वापरकर्त्यांनी वेगवेगळ्या विनोदी कमेंट्स केल्या आहेत.
RCB fans with RCB Jersey at Mahakumbh in Prayagraj and praying for RCB wins the IPL Trophy. 🥹
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 21, 2025
KING KOHLI & RCB – THE EMOTIONS. ❤️
pic.twitter.com/EQ8RIxAgWr
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ तीनदा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला, परंतु अद्याप विजेतेपद जिंकू शकलेला नाही. 2024 च्या आयपीएलमध्ये आरसीबीनेही प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता, पण यावेळीही संघाला ट्रॉफी गाठता आली नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक आहे, ज्याला जगभरातील 30 मिलियनहून अधिक लोक पाहतात.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा आयपीएल 2025 साठी अद्याप कर्णधार न मिळालेल्या तीन निवडक संघांपैकी एक आहे. दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी खेळाडू फाफ डु प्लेसिसने 2022-2024 पर्यंत बंगळुरूचे कर्णधारपद सांभाळले. पण डू प्लेसिस आता दिल्ली कॅपिटल्समध्ये गेला आहे, त्यामुळे आरसीबीला नवीन कर्णधाराची आवश्यकता आहे. बंगळुरूचे कर्णधारपद पुन्हा एकदा विराट कोहलीच्या खांद्यावर येऊ शकते, अशी चर्चा आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!