TNPL 2023 : बॅटिंग असावी तर अशी! एका ओव्हरमध्ये दोघांनी ठोकले 33 रन्स; पाहा Video

WhatsApp Group

TNPL 2023 : तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये (Tamil Nadu Premier League)क्रिकेटप्रेमींना रोमांचक क्रिकेटची मेजवानी मिळत आहे. सोमवारी, नेल्लई रॉयल किंग्ज आणि डिंडीगुल ड्रॅगन्स यांच्यातील सामन्यात उत्साहाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. नेल्लई रॉयल किंग्जने हा सामना 7 गडी राखून जिंकला. नेल्लईचा विजय सोपा वाटत असला तरी प्रत्यक्षात तसे नव्हते. डावाचे 19 वे षटक संघाच्या विजयात टर्निंग पॉइंट ठरले, ज्यामध्ये रितिक ईश्वरन आणि अजितेश गुरुस्वामी या जोडीने षटकारांचा वर्षाव करत 33 धावा केल्या आणि सामन्याचा रंगच बदलला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना डिंडीगुल ड्रॅगन्स संघाने निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 185 धावा केल्या. शिवम सिंगने सर्वाधिक 76 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात 18 षटकांनंतर नेल्लई रॉयल किंग्जची धावसंख्या 3 बाद 149 अशी होती आणि उर्वरित 2 षटकांत संघाला 37 धावांची गरज होती.

हेही वाचा – धोनी म्हणतो, “दीपक चहर हा ड्रग्जसारखा, माझ्या आयुष्यात मी त्याला….”

विजय अवघड दिसत होता. अशा स्थितीत विकेटवर रितिक ईश्वरन आणि अजितेश गुरुस्वामी या जोडीने जबरदस्त धमाका केला आणि जी. किशोरने टाकलेल्या डावाच्या 19व्या षटकात या दोघांनी 33 धावा केल्या. डावाच्या पहिल्या तीन चेंडूंवर रितिकने सलग षटकार ठोकत खळबळ उडवून दिली. चौथ्या चेंडूवर त्याने एकल घेत अजितेशला स्ट्राईक दिली. अजितेशने षटकाच्या 5व्या चेंडूवर षटकार ठोकला. शेवटचा चेंडू जी किशोरने टाकला, ज्यावर 2 धावा झाल्या, तर पुढच्या चेंडू फ्री हिट ठरला. यावर रितिकने षटकार मारला. षटकात 33 धावा झाल्या आणि आता शेवटच्या षटकात नेल्लई किंग्जच्या विजयात फक्त औपचारिकता उरली होती.

शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रितिकने षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. नेल्लई रॉयल किंग्जने अवघ्या तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. अजितेशने 44 चेंडूत 5 चौकार आणि तब्बल 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 73 धावा केल्या तर रितिकने 11 चेंडूत 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 39 धावा केल्या.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment