CPL 2022 : पोलार्डतात्या काय ऐकत नाय..! अद्भूत कॅच घेत सर्वांना केलंय थक्क; पाहा VIDEO

WhatsApp Group

CPL 2022 : कॅरेबियन प्रीमियर लीग ३१ ऑगस्टपासून सुरू झाली असून अनेक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. असंच काहीसं १ सप्टेंबर रोजी घडलं. जेव्हा त्रिनबागो नाइट रायडर्स संघाने सेंट लुसिया किंग्जचा ३ गडी राखून पराभव करून सामना जिंकला. सामना अतिशय रोमांचक झाला आणि त्रिनबागो नाइट रायडर्सनं ४ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू आणि टीकेआरचा कर्णधार कायरन पोलार्डनं अल्झारी जोसेफचा चौकारावर आश्चर्यकारक झेल घेतला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भन्नाट झेल

कॅरेबियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यात कायरन पोलार्डनं हवेत उडणारा झेल घेतला. जेडेन सील्सच्या २०व्या षटकातील चौथ्या चेंडूवर अल्झारी जोसेफनं मोठा फटका खेळला. हा चेंडू सरळ पोलार्डच्या हातात लाँग ऑनवर जाऊन विसावला. यासाठी पोलार्डला हवेत उंच उडी मारावी लागली. या सामन्यात अल्झारी जोसेफ ६ चेंडूत केवळ ९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

हेही वाचा – रोहित आणि रश्मिका…राडाच! हिटमॅनचं चित्रपटसृष्टीत पदार्पण? पोस्टर आलं समोर!

त्रिनबागो नाइट रायडर्सनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अकील हुसेनच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर त्रिनबागो संघानं लुसिया किंग्जला १४३ धावांवर रोखलं. किंग्जकडून रोशन प्राइमसने सर्वाधिक ३८ धावा केल्या. त्यानं आपल्या खेळीत ३ चौकार आणि २ षटकार मारले. तर मार्क डेलनंही २४ चेंडूत ३५ धावांची चांगली खेळी केली. आयपीएल व्यतिरिक्त इतर देशांमध्येही अनेक टी-२० लीगचं आयोजन करण्यात आलं आहे, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमियर लीगही खेळवली जात आहे. यामध्ये खेळाडू उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत आणि चांगली कामगिरी करत आहेत.

पोलार्डचा पराक्रम

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कायरन पोलार्ड हा टी-२० फॉरमॅटमधील जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वी पोलार्डनं टी-२० फॉरमॅटमध्ये नवा इतिहास रचला आहे. ६०० टी-२० सामने खेळणारा पोलार्ड जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. द हंड्रेड लीगमध्ये लंडनकडून खेळताना पोलार्डनं ही कामगिरी केली. पोलार्डनं या वर्षी एप्रिलमध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता.

हेही वाचा – भारी बातमी..! पुण्यात शिकलेला माणूस ‘स्टारबक्स’ कंपनीचा CEO झालाय; नक्की वाचा!

सर्वाधिक टी-२० खेळण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर ड्वेन ब्राव्हो आहे, ज्यानं ५४३ टी-२० सामने खेळले आहेत. पाकिस्तानचा अनुभवी शोएब मलिक ४७२ सामन्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ख्रिस गेलने ४६३ टी-२० सामने खेळले आहेत. इंग्लंडच्या रवी बोपारानं ४२६ टी-२० सामने खेळले आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment