Sachin Tendulkar Brand Ambassador of Chitale Bandhu Mithaiwale : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आता जगप्रसिद्ध चितळे बंधू मिठाईवाले यांचा ब्रँड अॅम्बेसेडर झाला आहे. चितळे बंधू कंपनीने 75 व्या वर्षात पदार्पण केले असून ही कंपनी मिठाई, स्नॅक्स, नमकीन अशा गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. पंचाहत्तरी गाठलेल्या या कंपनीने सचिनची ब्रँड अॅम्बेसेडरपदी निवड केली असून याबाबतचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सचिननेही याबाबतची एक पोस्ट शेअर केली आहे. ”एखाद्याच्या आयुष्यभराच्या स्वप्नाचा भाग बनणे खरोखरच विशेष आहे. चितळे बंधू 75 व्या वर्षात पदार्पण करत आहे, मला खात्री आहे की माझ्या हृदयाच्या खूप जवळ असलेला हा ब्रँड आणखी अनेक स्वप्ने पूर्ण करत राहील आणि आनंददायी आठवणी निर्माण करेल. आता चहा आणि चितळे बाकरवडी झालीच पाहिजे!”, असे सचिनने म्हटले आहे.
It's truly special to be a part of someone’s lifelong dream. As @ChitaleBandhu enters its 75th year, I am sure this brand that's so close to my heart will continue to fulfil many more dreams and create joyful memories.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 26, 2024
आता चहा आणि चितळे बाकरवडी झालीच पाहिजे!#Partnership https://t.co/xLCjUVK0dn
हेही वाचा – UPI नंतर आता रिझर्व्ह बँक लाँच करणार ULI, डिजिटल कर्जामध्ये क्रांतिकारी बदल!
1950 च्या सुमारास भाऊसाहेब चितळे आणि त्यांच्या नंतर राजाभाऊ चितळे यांनी चितळे बंधू मिठाईवालेची स्थापना केली. या व्यवसायात दोघांनी कमालीचे यश मिळवले. चितळे बंधू हे नाव असंख्य घरांत पोहोचले. क्वालिटी, क्लास या दोन्ही क्षेत्रात चितळे बंधूंचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. परदेशातही ही कंपनी आपला ठसा उमटवत आहे. आता सचिनचा हातभार हा लौकिक अजून वाढवेल यात शंका नाही.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!