Captain Suryakumar Yadav : भारतीय टी-20 संघाचा कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवने श्रीलंकेविरुद्ध शानदार खेळी केली आहे. सूर्यकुमारने 25 चेंडूत 58 धावा केल्या. सूर्याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील 20वे अर्धशतक झळकावले. कर्णधार म्हणून त्याचे हे तिसरे अर्धशतक होते. आऊट होण्यापूर्वी सूर्याने हार्दिक पांड्याला मागे सोडले. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो चौथा भारतीय कर्णधार ठरला.
भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट संघाचा पूर्णवेळ कर्णधार बनवण्यात आले आहे. कर्णधार म्हणून त्याने तुफानी अर्धशतक झळकावले. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. शुबमन गिल (34) आणि यशस्वी जयस्वाल (40) यांनी भारतीय संघाला वेगवान सुरुवात करून दिली. दोघे बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने धावा काढण्याची जबाबदारी घेतली. वेगवान फलंदाजी करताना, सूर्यकुमारने 22 चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 20 वे टी-20 अर्धशतक पूर्ण केले. त्याचबरोबर कर्णधार म्हणून सूर्यकुमारचे हे तिसरे अर्धशतक ठरले.
हेही वाचा – यावर्षी भारतीय रेल्वे आणणार पहिली हायड्रोजन ट्रेन..! यात विशेष काय? जाणून घ्या
हार्दिकला मागे सोडले
त्याच्या वादळी स्पेलमध्ये सूर्यकुमार यादवने हार्दिक पांड्याला मागे सोडले. टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा सूर्या हा चौथा फलंदाज ठरला. सूर्याने 16 धावा केल्यानंतर हार्दिक पांड्याला मागे सोडले. हार्दिकने कर्णधार म्हणून भारतासाठी 296 धावा केल्या आहेत. या यादीत माजी कर्णधार रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Suryakumar Yadav has 43.60 average and 168.75 Strike Rate in T20i cricket.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 27, 2024
– One of the best of this format. 💯pic.twitter.com/De0xgvqOll
भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय-टी20 धावा
1905 धावा – रोहित शर्मा
1570 धावा – विराट कोहली
1112 धावा – एमएस धोनी
339 धावा – सूर्यकुमार यादव*
296 धावा – हार्दिक पांड्या
सूर्यकुमार यादवने आपल्या खेळीदरम्यान 25 चेंडूंचा सामना केला. यादरम्यान त्याने 8 चौकार आणि 2 षटकार मारले. मथिशा पाथिरानाने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!