दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी बनला Byju’s चा ब्रँड अॅम्बेसेडर!

WhatsApp Group

Lionel Messi Byju’s Brand Ambassador : भारतातील आघाडीची EdTech कंपनी बायजूसने (Byju’s) ने स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची जागतिक ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. एडटेक स्पेसमध्ये सामाजिक प्रभाव वाढवण्यासाठी आणि सार्वत्रिक शिक्षणाचे ध्येय साध्य करण्यासाठी कंपनीने मेस्सीला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. FIFA विश्वचषक २०२२च्या आधी, बायजूसने मेस्सीला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. मेस्सी स्‍वत: त्‍याची स्वत:ची एनजीओ लिओ मेस्सी फाउंडेशन देखील चालवतो, जी आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात काम करते. मेस्सीसोबत एकत्र आल्याने सर्व शिक्षा अभियानाला गती मिळेल, असा कंपनीचा विश्वास आहे.

मेस्सीला कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवडण्यासाठी किती रक्कम दिली आहे याबद्दल बायजूसकडून माहिती देण्यात आलेली नाही. बायजूसच्या सह-संस्थापक दिव्या गोकुलनाथ यांनी तिच्या लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज आमच्या ५.५ लाखाहून अधिक प्रिय लोकांच्या आनंदासाठी आणखी १० कारणे आहेत. होय, लिओनेल मेस्सी हा बायजूच्या सर्वांसाठी शिक्षणाचा पहिला जागतिक भागीदार आहे.

हेही वाचा – शालेय शिक्षणाच्या ‘या’ निर्देशांकात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment