Pele Records : पेले यांचे ‘असे’ ३ रेकॉर्ड, जे मोडता येणं कठीण! एक तर अशक्यच…

WhatsApp Group

Brazil Legend Pele Records : ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. याबाबत पेले यांच्या मुलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. या दिग्गज फुटबॉलपटूला कर्करोग झाला होता. पेले गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात होते आणि २०२३ च्या सुरुवातीपूर्वीच त्यांचे निधन झाले. जरी ते आज या जगात नसले तरी त्यांचे रेकॉर्ड अजूनही जिवंत आहेत. पेले यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले. पण त्यांचे असे काही विक्रम आहेत जे मोडणे कठीण आहे.

तीन वेळा विश्वविजेता

पेलेंच्या उपस्थितीत ब्राझीलचा संघ तीन वेळा चॅम्पियन बनला. पेले यांनी १९५८, १९६२ आणि १९७० मध्ये विश्वचषक जिंकला होता. सर्वाधिक वेळा विश्वचषक जिंकण्याचा विक्रम पेलेंच्या नावावर आहे. एखाद्या खेळाडूसाठी त्याच्या करिअरमध्ये तीन वेळा वर्ल्ड चॅम्पियन बनणे सोपे नसते.

हेही वाचा – PM Modi Mother Death : हीराबेन यांच्या मृत्यूनंतर मोदींचं भावूक ट्वीट; म्हणाले, “आईमध्ये मला…”

सर्वाधिक गोल

पेलेने आपल्या कारकिर्दीत एकूण १३६३ सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. या सामन्यांमध्ये त्याचे एकूण १२८३ गोल आहेत. त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. त्यांनी १९५९ आणि १९६१ मध्ये अनुक्रमे १२७ आणि ११० गोल केले.

सर्वाधिक हॅट्ट्रिक गोलसाठी रेकॉर्ड

सर्वाधिक हॅटट्रिकचा विक्रमही पेलेंच्या नावावर आहे. पेले यांनी आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक ९२ हॅट्ट्रिक्स केल्या आहेत. या यादीत पेलेच्या खाली इतर अनेक खेळाडू आहेत. पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने ६० हॅट्ट्रिक गोल केले आहेत. तर अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने ५६ हॅटट्रिक्स केल्या आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment