बॉर्डर-गावसकर ट्रॉफी : जसप्रीत बुमराहचा कांगारूंना दणका! पहिला कसोटी सामना 295 धावांनी जिंकला

WhatsApp Group

Border Gavaskar Trophy IND vs AUS 1st Test : जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना 295 धावांनी जिंकला आहे. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 534 धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला 238 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने 89 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त मिचेल मार्शने 47 धावा केल्या. पण भारताचे हे विशाल आव्हान कांगारू संघाला पेलवले नाही. रोहित शर्मा, शुबमन गिल, रवींद्र जडेजा यांच्या अनुपस्थितीत भारताने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवलाय

सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या दिवशी भारताने 49.4 षटकात 10 बाद 150 धावा केल्या. जोश हेझलवूड (4), पॅट कमिन्स (2), मिचेल स्टार्क (2), मिचेल मार्श (2) यांनी भारताच्या डावाला सुरूंग लावला. प्रत्युत्तरात भारतानेही ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडत त्यांचा डाव 104 धावांवर गुंडाळला. पहिल्या डावात भारताकडून बुमराहने 30 धावांत 5, हर्षित राणाने 3 आणि मोहम्मद सिराजने 2 विकेट्स घेतल्या.

दुसऱ्या डावात भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी वादळी सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी 201 धावा ठोकल्या. राहुलने 77 धावांची खली केली. त्यानंतर यशस्वी आणि विराट कोहलीने शतके ठोकत भारताला मोठ्या धावसंख्येकडे नेले. यशस्वीने 15 चौकार आणि 3 षटकारांसह 161 धावा, तर विराटने 8 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 100 धावा केल्या. पदार्पणवीर अष्टपैलू खेळाडू नितीश रेड्डीने नाबाद 38 धावांचे योगदान दिले. त्यामुळे भारताने आपला दुसरा डाव 6 बाद 487 धावांवर घोषित केला.

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावातही गुडघे टेकले. अवघ्या 79 धावांमध्ये त्यांनी अर्धा संघ गमावला. ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांनी प्रतिकार केला, पण तो अपुरा पडला. अलेक्स कॅरीने 36 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 238 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात भारताकडून कप्तान बुमराह, सिराज यांनी प्रत्येकी 3 तर वॉशिंग्टन सुंदरने 2 विकेट्स घेतल्या. हर्षित राणा आणि नितीश रेड्डी यांना प्रत्येकी 1-1 विकेट्स मिळाल्या.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment