BCCI चा केंद्रीय करार जाहीर! श्रेयस अय्यरचं कमबॅक, ३४ खेळाडूंची चांदी!

WhatsApp Group

BCCI Central Contract 2025 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा बहुप्रतिक्षित केंद्रीय करार जाहीर झाला आहे. २१ एप्रिल रोजी, २०२४-२५ हंगामासाठी भारतीय वरिष्ठ पुरुष संघाचे वार्षिक करार जाहीर करण्यात आले. नेहमीप्रमाणे, खेळाडूंना A+, A, B आणि C श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे.

श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना पुन्हा करार मिळाला असून ऋषभ पंत आता ग्रेड ए मध्ये आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना अव्वल म्हणजेच ए+ श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. वरुण चक्रवर्ती, अभिषेक शर्मा, नितीश राणा, हर्षित राणा, सरफराज खान आणि ध्रुव जुरेल या नव्या खेळाडूंचाही करारात समावेश करण्यात आला आहे.

३४ खेळाडूंना केंद्रीय करार  

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २०२४-२५ च्या वार्षिक करारात एकूण ३४ खेळाडूंना संधी दिली आहे. बीसीसीआयच्या करार यादीतून वगळल्यानंतर एका वर्षानंतर, इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी पुनरागमन केले कारण बीसीसीआयने त्यांना २०२४/२५ हंगामासाठी केंद्रीय करार यादीतून वगळले.

हेही वाचा – मोहम्मद अझरुद्दीनचं नाव हैदराबाद स्टेडियमवरून हटवण्याच्या सूचना; नेमकं मॅटर काय?

रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह हे चार क्रिकेटपटू ग्रेड ए प्लस श्रेणीत आहेत. २०२४ च्या विश्वचषकानंतर रोहित, विराट आणि जडेजा यांनी टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यामुळे, त्यांना अव्वल श्रेणीत स्थान मिळण्याची अपेक्षा नव्हती. साधारणपणे, या श्रेणीत फक्त तेच खेळाडू समाविष्ट केले जातात जे तिन्ही फॉरमॅटमध्ये नियमित असतात. हे तिघेही कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळत आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment