चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ब्लंडर! पाकिस्तानने खाल्ली माती, ऑस्ट्रेलिया-इंग्लंड मॅचमध्ये वाजवलं भारताचं राष्ट्रगीत!

WhatsApp Group

Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्येही ब्लॉकबस्टर सामन्यांची मालिका सुरूच आहे. शनिवारी (२२ फेब्रुवारी) लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक गमावली आणि प्रथम फलंदाजी केली. या सामन्यात अशी एक घटना पाहायला मिळाली, ज्यामुळे चाहते थक्क झाले.

सामना सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही देशांचे राष्ट्रगीत वाजवण्यात येणार होते. पण ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीताऐवजी भारताचे राष्ट्रगीत वाजू लागले. चूक लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी ताबडतोब भारतीय राष्ट्रगीत थांबवले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. तोपर्यंत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

यजमान देश पाकिस्तानची ही मोठी चूक मानली जाईल. भारतीय संघाला २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानमध्ये एकही सामना खेळण्याची गरज नाही. आठ संघांच्या या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला, त्यानंतर ‘हायब्रिड मॉडेल’ स्वीकारण्यात आले. भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आयोजित केलेल्या प्रत्येक सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे राष्ट्रगीत वाजवले जाते. हा कार्यक्रम टॉस नंतर होतो.

रविवारी भारत-पाकिस्तान सामना

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ फेब्रुवारी (रविवार) रोजी होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता सुरू होईल. या सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर मोहम्मद रिझवान पाकिस्तानी संघाचे नेतृत्व करेल.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment