VIDEO : धोतर-कुर्ता घालून क्रिकेट टुर्नामेंट, संस्कृतमध्ये कॉमेंट्री; विजेत्या संघाला ‘अयोध्या ट्रिप’!

WhatsApp Group

दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे संस्कृत वार्षिक स्पर्धेचे (Bhopal Sanskrit Cricket Tournament) आयोजन करण्यात आले आहे. मध्य प्रदेशच्या राजधानीतील अंकुर मैदानावर शुक्रवारी ही स्पर्धा सुरू झाली, ज्यामध्ये खेळाडू एकमेकांशी संस्कृतमध्ये बोलत होते, अगदी पंचही संस्कृतमध्ये टिपण्णी करताना दिसत होते. समालोचक मैदानावरील सामन्याची कॉमेंट्री संस्कृत भाषेत देताना दिसले. अध्यात्मिक गुरू महर्षी महेश योगी यांनी स्थापन केलेली संस्था देशाच्या काही भागात वैदिक शाळा आणि सेमिनार चालवते.

विजेत्याला मिळणार ‘अयोध्या ट्रिप’

पाश्चिमात्य देशांमध्ये योग लोकप्रिय करणारे महर्षी महेश योगी यांच्या जयंती (12 जानेवारी) निमित्त आयोजित चार दिवसीय कार्यक्रमात विजेत्या संघाला यंदा अयोध्येला जाण्याची संधी मिळेल, असे वार्षिक स्पर्धेच्या संयोजकाने सांगितले. या महिन्यात 22 जानेवारीला राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे.

विजेत्याला बक्षीस रक्कम

विजेत्यांना 22 जानेवारीनंतर अयोध्येला पाठवले जाईल. त्यांना 21,000 रुपये, तर उपविजेत्याला 11,000 रुपयांचे बक्षीस मिळेल. क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या हंगामात भोपाळच्या चार संघांसह 12 संघ सहभागी होत आहेत. एका आयोजकाने सांगितले की, या कार्यक्रमाचा उद्देश वैदिक कुटुंबामध्ये संस्कृत आणि क्रीडा भावना वाढवणे हा आहे. पुरस्कारांशिवाय खेळाडूंना वैदिक पुस्तके आणि 100 वर्षांचे पंचांग देऊन सन्मानित केले जाईल.

हेही वाचा – क्रिकेटर अंबाती रायुडूने 10 दिवसात सोडलं राजकारण, पक्षातून बाहेर!

राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. 22 जानेवारीला अभिषेक कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी या भव्य मंदिराचे उद्घाटन करतील. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पाहुणे उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. त्यात तीन ते चार हजार साधू-मुनी असतील. या कार्यक्रमात पीएम मोदींशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान कडक सुरक्षा व्यवस्थाही असणार आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment