BCCI Offcial On Senior Players : टी-२० विश्वचषक २०२२ मधील पराभवानंतर भारतीय टी-२० संघ पूर्णपणे बदलला आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेसाठी (IND vs NZ) भारतीय निवड समितीने नुकताच संघ जाहीर केला आहे. सलग तिसऱ्या टी-२० मालिकेत हार्दिक पंड्या संघाची धुरा सांभाळणार आहे. या सगळ्या दरम्यान टीम इंडियाच्या कॅम्पमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, BCCI ने टीमच्या दोन खेळाडूंना टी-२० मधून कायमचे काढून टाकले आहे.
टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. इनसाइडस्पोर्टच्या वृत्तानुसार, या दोन्ही खेळाडूंना टी-२० संघातून कायमचे वगळण्यात आले आहे. टी-२० वर्ल्डकप २०२२ नंतर या दोन्ही खेळाडूंनी भारतासाठी एकही टी-२० सामना खेळलेला नाही.
BCCIच्या अधिकाऱ्याने दिले मोठे अपडेट
इनसाइडस्पोर्टशी बोलताना बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय टी-२० संघातून रोहित शर्मा आणि विराट कोहलीला वगळणे कायम आहे. भविष्यात काहीही होऊ शकते, परंतु सध्या आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे. पुढे जा आणि २०२३ च्या टी-२० विश्वचषकासाठी संघाची योजना करा. दुर्दैवाने, ते गोष्टींच्या नवीन योजनेत बसत नाहीत. आपण त्यांचे भविष्य कसे ठरवू शकतो. निवडकर्ते केवळ भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठी संघ निवडू शकतात. रोहित, विराट आणि इतर त्यांच्या भविष्याबद्दल निर्णय घेण्यास आणि बोलण्यास पूर्णपणे मोकळे आहेत.
हेही वाचा – IRCTC Tour Package : ज्योतिर्लिंग दर्शन करायचंय? राहणं-खाणं एकदम Free..! चेक करा डिटेल्स
What are your views about this squad? 🤔👇🏻#CricketTwitter #india #indvsnz pic.twitter.com/zamyFAvlC5
— Sportskeeda (@Sportskeeda) January 13, 2023
या खेळाडूंचे संघात पुनरागमन करणे कठीण
विराट कोहली आणि रोहित शर्मासोबतच मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, आर. अश्विन आणि दिनेश कार्तिक यांनाही टी-२० संघात पुनरागमन करणे कठीण जात आहे. हे सर्व खेळाडू २०२२ च्या टी-२० विश्वचषकापासून संघाचा भाग बनू शकले नाहीत.
न्यूझीलंड विरुद्ध भारतीय टी-२० संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र सिंग चहल, अर्शदीप सिंग उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.