चेन्नई सुपर किंग्जचा ‘हा’ धुरंधर होणार टीम इंडियाचा नवा कोच?

WhatsApp Group

Team India Coach : टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये लवकरच बदल दिसू शकतात. सध्या राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे, मात्र बीसीसीआयने नवीन मुख्य प्रशिक्षक नेमण्याची प्रक्रिया सुरू केल्याची बातमी इंडियन एक्सप्रेसमधून येत आहे. न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू स्टीफन फ्लेमिंग भारताचा नवा प्रशिक्षक होईऊ शकतो, असे सांगितले जात आहे. फ्लेमिंग आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या पदासाठी कधी अर्ज करतो याची बीसीसीआयचे अधिकारी वाट पाहत आहेत. बीसीसीआयच्या अटींनुसार नवीन प्रशिक्षकाला तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.

बीसीसीआयने भारतीय संघाच्या नवीन प्रशिक्षकासाठी अर्ज घेणे सुरू केले असून 2024 च्या टी-20 विश्वचषकानंतर नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाऊ शकते. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 मे ठेवण्यात आली आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की 2009 पासून चेन्नई सुपर किंग्जचा प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग हा नव्या प्रशिक्षकाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. असे झाले तर येत्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटची स्थिती बदलण्याची शक्यता आहे. फ्लेमिंगकडे उत्तम व्यवस्थापन कौशल्य आहे आणि त्याला सकारात्मक वातावरण निर्माण करून खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी कशी मिळवायची हे माहीत आहे. आयपीएलमधील प्रशिक्षक म्हणून त्याच्या यशाच्या टक्केवारीमुळे त्याच्याकडे टीम इंडियाचा नवीन प्रशिक्षक म्हणूनही पाहिले जात आहे.

हेही वाचा – नरेंद्र मोदींची एकूण संपत्ती किती? ते किती टॅक्स भरतात? घरात रोख किती? जाणून घ्या

मार्चमध्ये आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वीच, राहुल द्रविडने बीसीसीआयकडे मागणी केली होती की त्याला त्याच्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवायचा आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी अलीकडेच सांगितले होते की जर राहुल द्रविडला भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर राहायचे असेल तर त्याला पुन्हा अर्ज प्रक्रियेतून जावे लागेल. संघातील काही वरिष्ठ खेळाडूंनी द्रविडला किमान कसोटी संघात राहावे, अशी मागणी केली होती, परंतु त्याने आधीच निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयला कसोटी आणि मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाला दोन वेगळे प्रशिक्षक द्यावे लागतील.

टीम इंडियाचा जो कोणी नवीन प्रशिक्षक असेल, त्याचा कार्यकाळ 1 जुलैपासून सुरू होईल आणि 31 डिसेंबर 2027 पर्यंत चालेल. याचा अर्थ नवीन प्रशिक्षक 2027 च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकापर्यंत भारतीय संघाची जबाबदारी सांभाळतील. एका मीडिया रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, मुख्य प्रशिक्षकाव्यतिरिक्त सपोर्टिंग स्टाफमध्ये 14-16 लोकांना ठेवले जाऊ शकते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment