गौतम गंभीरला टीम इंडियाचा हेड कोच बनण्याची ऑफर!

WhatsApp Group

Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने गौतम गंभीरला 2024 च्या टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारण्याची ऑफर दिली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. टी-20 वर्ल्डकप 2024 नंतर राहुल द्रविड टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणार आहे.

द्रविडचा कार्यकाळ संपणार आहे. भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर त्यांचा कार्यकाळ आगामी विश्वचषकापर्यंत वाढवण्यात आला. सोमवारी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत.

हेही वाचा – UPI Payment On Feature Phone : कीपॅड फोनवरूनही तुम्ही करू शकता यूपीआय पेमेंट! कसं ते माहीत करून घ्या…

दरम्यान, ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालातून असे समोर आले आहे की, बीसीसीआयला गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळायची आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment